Indigo Direct Flight Goa To Bhopal Dainik Gomantak
गोवा

Goa-Bhopal Flight: 1 डिसेंबरपासून आणखी एक शहर गोव्याशी विमानाने जोडले जाणार, इंडिगोची घोषणा; वेळ, तिकीटदर किती वाचा?

Goa-Bhopal Indigo Direct Flight: ‘इंडिगो’ या भारतातील आघाडीच्या वाहतूक कंपनीतर्फे १ डिसेंबरपासून गोवा ते भोपाळ यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bhopal Indigo Flight Timing

पणजी: ‘इंडिगो’ या भारतातील आघाडीच्या वाहतूक कंपनीतर्फे १ डिसेंबरपासून गोवा ते भोपाळ यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. आठवड्यातून सहा फेऱ्या सुरू करण्यात येतील. सध्या या मार्गावर थेट विमानसेवा नाही. या मार्गावर विमान प्रवास करायचा असल्यास एका ठिकाणी थांबा आहे आणि तिकीटाचे दरही जास्त आहेत. त्यामुळे इंडिगोच्या या घोषणेचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

‘इंडिगो’च्या ग्लोबल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले की, गोव्याबरोबर भारतातील आणखी एक शहर आमच्या नेटवर्कमध्ये जोडतांना आंम्हाला आनंद होत आहे. गोवा आणि भोपाळदरम्यान थेट विशेष सेवा सुरू केल्यामुळे आता गोव्यातून भारतातील २२ शहरांसाठी आठवड्याला सरासरी ४०० फेऱ्या होतील. या नवीन मार्गामुळे या महत्त्वपूर्ण भागातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल. भारतातील एक आघाडीचे प्रवासी वाहतूक सेवा कंपनी म्‍हणून आम्ही नेहमीच आमच्या प्रवाशांना परवडणारी, वेळेत, नम्र आणि तणावमुक्त सेवा देण्यास वचनबद्ध आहोत.

आकर्षक समुद्रकिनारे, उत्तम नाईट-लाईफ आणि पोर्तुगीज परंपरेसाठी प्रसिद्ध अशा गोव्यात सूर्यप्रकाश, वाळू आणि संस्कृती यांचे मिश्रण आहे. पर्यटक नेहमीच ओल्ड गोव्यातील ऐतिहासिक चर्चेस, वॉटर-स्पोर्टस्‌ किंवा आकर्षक किनाऱ्यांसह आनंद घेण्यासाठी येथे नेहमीच भेट देत असतात. तर, ‘तलावांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोपाळमध्ये शाही थाट आणि नैसर्गिक सुंदरता भरलेली आहे.

Goa Bhopal Indigo Direct Flight Schedule:

1 डिसेंबरपासून सेवा सुरू होणार

वेळ :

गोवा - भोपाळ Flight Number: 6E 366

प्रस्थान : दुपारी एक वाजता

आगमन : दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी

भोपाळ - गोवा Flight Number: 6E 367

प्रस्थान : दुपारी तीन वाजून २० मिनिटांनी

आगमन : संध्याकाळी पाच वाजून १० मिनिटांनी

तिकीटाचे दर : 5,755 रुपये ( नोंद :15 नोव्हेंबररोजी १ डिसेंबरच्या विमानाचे तिकीट दर तपासले असता हे दर दाखवत होते)

दरम्‍यान, वेबसाईट www.goIndiGo.in वरून किंवा ॲपवरुन या विमानांचे बुकिंग प्रवासी करू शकतील. या नवीन फेऱ्यांमुळे एअरलाईनच्या स्थानिक जोडणीला चालना मिळू शकेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

ZIM vs NZ: न्यूझीलंडने 67 वर्षांचा विक्रम मोडला, कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला

Horoscope: राजराजेश्वर योगाचा शुभ प्रभाव; ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' 6 राशींना मिळेल यश आणि सन्मान

Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

SCROLL FOR NEXT