Extortion Case Dainik Gomantak
गोवा

Extortion Case: 25 लाखांचे खंडणी प्रकरणी दिग्विजीत चव्हाणला अटकपूर्व जामीन

25 लाखांचे खंडणी प्रकरण: गोव्याबाहेर न जाण्याची न्यायालयाची अट

दैनिक गोमन्तक

Extortion Case:

एका युवतीचा विनयभंग केला, असा आरोप करून मडगावातील प्रसिद्ध डॉक्‍टर प्रकाश अवदी यांच्‍या पुत्राकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्‍याचा आराेप असलेला नावेलीचा व्‍यावसायिक दिग्विजीत चव्‍हाण याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश शमा जोशी यांनी मंजूर केला.

न्यायालयाने हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर करताना चव्‍हाण याला अटक केल्‍यास २५ हजारांच्‍या जामिनावर मुक्‍त करावे, असा आदेश मडगाव पोलिसांना दिला.

याप्रकरणी डॉ. अवदी यांचे पुत्र पुष्‍कर अवदी यांनी चव्‍हाण याने आपल्‍याकडून २५ लाखांची खंडणी मागितली होती, अशी तक्रार मडगाव पोलिसांत दिली होती.

मात्र, दिग्विजीत चव्‍हाण याच्‍यावतीने युक्तिवाद करताना ॲड. स्‍पेन्‍सर व्‍हिएगस यांनी आपल्‍या अशिलाने पीडित युवतीला मदत केली यामुळेच त्‍याच्‍यावर हा खोटा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला, असा दावा केला.

न्‍यायालयाच्‍या अटी : न्‍या. जोशी यांनी सर्व बाजू ऐकून घेतल्‍यानंतर गुुरुवारी (ता.३०) दुपारी हा जामीन मंजूर केला. चव्‍हाण याने न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय गोव्‍याबाहेर जाऊ नये तसेच पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न करू नये, अशा अटी घालण्‍याबरोबर तपास अधिकाऱ्यांना गरज पडल्‍यास तपासासाठी त्‍याने पोलिस स्‍थानकावर हजेरी द्यावी, असे म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT