Ghumat Aarti Competition: ‘गोमन्तक यीन’तर्फे ‘घुमट गंध’ स्पर्धेचे आयोजन

15 सप्टेंबर रोजी होणार उद्‌घाटन: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सांगितीक पर्वणी
Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin
Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak YinDainik Gomantak

Ghumat Aarti Competition: ‘गोमन्तक’ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि श्रीनिवास सिनाय धेंपो वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, कुजिरा- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डेक्कन फाईन केमिकल्स यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘घुमट गंध’ स्पर्धेचे धेम्पो महाविद्यालयात आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धेचे उद्‍घाटन दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin
Goa Molestation Case: प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पारंपरिक पद्धतीने आरती म्हणण्याची कला युवा पिढीमध्ये रुजावी तसेच हौशी युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रथम तीन विजेत्यांना रोख बक्षीस आणि चषक या स्वरुपाची बक्षिसे तर सहभागी पथकांना प्रशस्तिपत्र देण्यात येईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचे सादरीकरण ‘गोमन्तक’ टीव्ही या वाहिनीवर प्रसारित करण्यात येईल. तसेच या विजेत्यांना चतुर्थी काळात ‘गोमन्तक’ भवनातील गणपतीसमोर आपले सादरीकरण सादर करण्याची संधी मिळेल.

Organized 'Ghumt Gandha' competition by Gomantak Yin
Goa Ganpati Festival 2023: ढवळी गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा चतुर्थी बाजार!

अशी करा नाव नोंदणी ः https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvZL5cIPenwgxBbVGqDeTfXXH_cQFaZu8KhvKu anmOApqgYA/viewform?usp=sf_link

या संकेतस्थळास भेट देऊन इच्छुक महाविद्यालयांनी आपले नाव नोंदवावे. महाविद्यालयांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची पथके पाठवून सहभागी व्हावे,असे आवाहन ‘गोमन्तक यीन’ तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिवम पालयेकर ः ९३२५५ ७९१८२ किंवा प्रा. आनंद पनवेलकर ९४२२४५३२२४ तसेच वैभव नाईक ८३२९९०२९३१ यांच्याशी संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com