Goa Garbage Issue: कुडचडेत बाहेरचा कचरा आणू नका, माजी नगराध्यक्ष होडरकर आक्रमक...

माजी नगराध्यक्ष होडरकर आक्रमक : आमदाराने माहिती दडवून ठेवल्याचा आरोप
Goa Garbage Issue
Goa Garbage IssueDainik Gomantak

Goa Garbage Issue: कुडचडे येथील शंभर मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात आता बाहेरून कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सोनसड्यावरील कचरा प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून हे स्पष्ट झाले आहे. यामागे कुडचडेचे आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल यांचा छुपा डाव आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांनी केला.

Goa Garbage Issue
Goa Molestation Case: प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत होडरकर यांनी सांगितले की, कुडचडे येथील प्रकल्पात बाहेरून कचरा आण्यास लोकांचा विरोध आहे. त्यामुळे लोकांनी आता बाहेरून येणारी कचरावाहू वाहने अडवली तर आपला लोकांना पूर्ण पाठिंबा राहील. तसेच आपणही लोकांसोबत असेन, असे ते म्हणाले.

कुडचडे येथे जो कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे, त्यात फक्त केपे, सांगे, कोणकोण व धारबंदोडा या चार तालुक्यातील कचरा आणला जाणार असल्याचे पूर्वी सांगण्यात येत होते. परंतु हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास कचरा अपुरा पडत असल्याने आता सोनसड्यावरील कचरा या प्रकल्पात आणण्यात येणार आहे, असे होडरकर यांनी सांगितले.

लोकांनी एकत्र यावे

या प्रकल्पात आता बाहेरून कचरा येणार आहे. याचा त्रास स्थानिकांना होणार आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज व इतर माध्यमातून होणारे उत्पन्न बाहेरील लोक घेऊन जाणार आहेत. त्यामुळे लोकांनी या प्रकल्पात बाहेरून आणण्यात येणाऱ्या कचऱ्याला विरोध करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन होडरकर यांनी केले आहे.

Goa Garbage Issue
Goa Ganpati Festival 2023: ढवळी गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा चतुर्थी बाजार!

काब्राल यांना पूर्ण कल्पना...

मंत्री नीलेश काब्राल यांना पूर्ण माहिती होती. चार तालुक्यात मिळून कचरा शंभर टन होणार नाही, तरीही हा शंभर टन क्षमतेचा प्रकल्प कुडचडेवासीयांच्या माथी मारण्यात आला. या प्रकल्पात सध्या दहा टनांचे दोन कॅम्पेक्टर आणले आहेत. ते का आणले आहेत ते आता लोकांना कळून चुकले आहे. उच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे, तो एकाएकी आलेला नाही. याची माहिती कायदा मंत्री या नात्याने काब्राल यांना नव्हती का, असा प्रश्न होडरकर यांनी उपस्थित केला.

प्रकल्पात परप्रांतीय अभियंते...

या प्रकल्पात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्थानिक लोक आहेत, पण या ठिकाणी अभियंते मात्र परप्रांतीय आहेत. कुडचडे मतदारसंघात या ठिकाणी काम करण्यासाठी अभियंत्यांची वानवा आहे का, असा प्रश्न होडरकर यांनी उपस्थित केला. या ठिकाणी पालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेला कचरा तसाच आहे, तो अजून उचललेला नाही, असे होडरकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com