Taxi in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 9366 टॅक्सींना डिजिटल मीटर

6 वाहनांवर कारवाई; वाहतूक खात्याची खंडपीठाला माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात टॅक्सींना डिजिटल मीटर सक्तीचे आहेत. आतापर्यंत 9366 टॅक्सीमालकांनी डिजिटल मीटर बसविले असून, आणखी 50 जणांनी ते बसविण्यासाठी कंत्राटदाराकडे नोंदणी केलेली आहे. डिजिटल मीटर नसताना रस्त्यावर धावणाऱ्या सहा टॅक्सींविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला देण्यात आली. आता पुन्हा ही सुनावणी येत्या 20 जूनला ठेवण्यात आली आहे.

अवमान याचिका काल सोमवारी गोवा खंडपीठासमोर आली असता राज्यातील बहुतांश टॅक्सीमालकांनी डिजिटल मीटर बसविण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात आले. ज्या टॅक्सींना हे मीटर नाहीत त्या रस्त्यावर धावत नाहीत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत फक्त टॅक्‍सी डिजिटल मीटरविना धावताना सापडल्या आहेत. या मीटरची दररोज तपासणी करणे खात्याच्या आवाक्याबाहेर आहे. टॅक्सी परवाना नूतनीकरणावेळी जेव्हा अर्ज केला जातो, तेव्हा डिजिटल मीटर असल्यासच नूतनीकरण केले जाते. त्यामुळे डिजिटल मीटर नसताना रस्त्यावर धावणाऱ्या टॅक्सींची संख्या नगण्य आहे असे सांगून हा अर्ज निकालात काढण्याची विनंती वाहतूक खात्यातर्फे गोवा खंडपीठाला करण्‍यात आली.

अवमान याचिकेनंतर टॅक्सीमालकांना डिजिटल मीटर बसवण्यासाठी मुदत द्यावी व जे कोणी त्याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे वाहतूक खात्याने डिजिटल मीटर बसवण्याचे कंत्राट देऊन या टॅक्सीमालकांना पुरेशी मुदत दिली होती. परिणामी टॅक्सीमालकांनी हे मीटर बसवण्यास सुरूवात केली व ज्यांनी ते बसविले नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली.

टॅक्सीचालकांना डिजिटल मीटर सक्तीची करण्याची मागणी ट्रॅव्हल अॅण्‍ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) या पर्यटन क्षेत्राशी संबंधित असलेल्या संघटनेने केली होती. टॅक्सीचालकांच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनेने केला होता. केंद्र सरकारने टॅक्सींना मीटर सक्तीचे केले असले तरी राज्य सरकार त्यासाठी पावले उचलत नाही, असे नमूद केले होते. उच्च न्यायालयाने मीटर बसवण्याचा आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नसल्याने याचिकादाराने अवमान याचिका सादर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT