वास्को : मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कासकर यांनी मुरगावच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा राज्य पालिका संचालकाकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.
17 महिने नगराध्यक्षपद भूषविलेले कासकर यांने विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे. मुरगाव पालिकेचे 53 व्या नगराध्यक्षपदी दाबोळी-वाडे येथील इतर मागासवर्गीय प्रभाग 25चे नगरसेवक लिओ रॉड्रिगीस होणार असल्याचे निश्चित झाले आहे. नगरसेवक रॉड्रिगीस माजी नगरविकास मंत्री मिलींद नाईक, मुरगाव तालुक्याचे पालकमंत्री माविन गुदिन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे निकटवर्तीय आहेत.(Damodar Kaskar Resigns)
मुरगाव पालिकेचे 52 वे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात 5 कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. मुरगावच्या 53 व्या नगराध्यक्षपदी रॉड्रिगीस यांची निवड जवळ जवळ निश्चित असली तरी विरोधी नगरसेवकांनीही आपल्या गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी व्यूवरचना आखली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.