Digital Banking In Goa Dainik Gomantak
गोवा

Digital Banking In Goa: दक्षिण गोव्यात डिसेंबरपर्यंत 100 टक्के डिजिटल बँकिंग

तीनवेळा मुदत देऊनही आत्तापर्यंत 94 टक्के डिजिटल बँकिंग पूर्ण

Akshay Nirmale

Digital Banking In Goa: प्रत्येक ग्राहकाला डिजिटल बँकिंग सेवा सुनिश्चित करणारे पहिले राज्य बनण्यासाठी गोवा सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, तीनवेळा मुदत देऊनही दक्षिण गोव्याला अजून १०० टक्के डिजिटल बँकिंग करण्यात अपयश आले आहे.

दक्षिण गोव्यातील बँकिंग सेवेचे डिजिटायझेशन 94 टक्क्यांवर आले. मार्चमध्ये ते 92 टक्के होते. आता डिसेंबर 2023 पर्यंत 100 टक्के लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. दक्षिण गोव्यातील सर्व बँकिंग ग्राहकांना डिसेंबरपर्यंत डिजिटल पेमेंटची सुविधा मिळेल, याची खात्री बँकांकडून घेतली जात आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा पारंपरीक अडथळा यात आहे. त्यामुळे गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकारने आणखी काही करावे अशी बँकिंगमधील तज्ज्ञांची इच्छा आहे. राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) च्या बैठकीत चर्चेतही राज्यातील सुरळीत आणि अखंडित ग्राहक सेवा बिंदूंसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या पैलूवर चर्चा झाली.

राज्य सरकार तसेच बँकांना गोवा हे 100 टक्के डिजिटल सक्षम असलेले देशातील पहिले राज्य बनवायचे आहे. राज्यात बँकिंग सेवेची कमतरता असलेली चार गावे होती, परंतु बँकांनी आता ही दरी भरून काढण्यासाठी आणि आर्थिक समावेशन सुनिश्चित करण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधी आणि बँक मित्रांची नियुक्ती केली आहे.

डिजिटल पेमेंट इकोसिस्टमचा विस्तार अधिक व्यापक करण्यासाठी आरबीआय पुढाकार घेत आहे. मार्च 2020 उत्तर गोव्यात डिजिटल बँकिंग सेवा आणि डिजिटल पेमेंट सुनिश्चित केल्यानंतर, दक्षिण गोव्याकडे लक्ष वळवण्यात आले.

दरम्यान, प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) बँक खात्यांमधील ठेवींमध्ये घट झाल्याची माहिती आहे. जून तिमाहीसाठी PMJDY खात्यातील ठेवी 144 कोटी रुपये आहेत. मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात 18.3 कोटी रुपयांची घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT