Digambar will join BJP in work Amit Shah's contacts are hotly debated Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामत जाणार भाजपमध्ये? राजकीय वाटचालीसंदर्भात जोरदार चर्चा

अमित शाह यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी : दिगंबर कामत यांनी भाजपच्या स्थापनादिनानिमित्त सत्ताधारी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. कामत सपत्निक दिल्ली दौऱ्यावर आहेत. तेथे ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

कामत यांना विश्‍वासात न घेता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधिमंडळ आणि प्रदेश काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची निवड केली आहे. कामत यांना डावलून माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिल्लीला बोलवून घेण्यात आले. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव व चोडणकर यांनी परस्पर गोव्याच्या नेतृत्वबदलाचा आलेख लिहिला. या प्रकारामुळे कामत कमालीचे नाराज व अस्वस्थ आहेत.

दोन दिवसांपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या एका गटापुढे बोलताना कामत यांनी आपल्याला डावलल्याची भावना व्यक्त केली होती. कामत यांनी आपल्या विश्‍वासू सहकाऱ्यांना नाराजीची कल्पना दिली आहे. ज्या पक्षात मान नाही त्या पक्षात तुम्ही राहू नका, असा सल्ला त्यांना कार्यकर्त्यांनी दिला.

मडगावमधील कामत यांच्या विश्‍वासू सहकारी व मित्रांनीही समाजमाध्यमांवर चर्चा करताना कामत हे काँग्रेस (Congress) सोडून जाऊ शकतात, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कामत यांनी निवडणुकीपूर्वी इतर उमेदवारांसह राज्यातील देवस्थानांना भेटी दिल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही पक्ष सोडणार नाही, अशा आणाभाका यावेळी घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे देवाला मानणारे दिगंबर कामत (Digambar Kamat) कोणत्याही परिस्थितीत असा विश्‍वासघात करणार नाहीत, अशी प्रतिक्रियाही समाजमाध्यमांत फिरत आहे.

कामत यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांना कोणतीही माहिती नाही. निवडणुकीच्या काळात पक्षश्रेष्ठींनी परस्पर निर्णय घेताना भाजप (BJP) नेतृत्वाला अंधारात ठेवले होते. सध्याही मंत्रिमंडळात तीन जागा रिकाम्या आहेत, त्याबाबत दिल्लीत निर्णय घेतला जात असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बॉयफ्रेंड असू दे, पण त्याच्यासोबत लग्न नको'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलीला अजब सल्ला! स्वतः मात्र लहान वयात अडकली होती विवाहबंधनात

Goa Weathe: गोव्यात विजांसह वादळी वाऱ्याचा इशारा; पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात यलो अलर्ट

Greater Noida Accident: पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी! ग्रेटर नोएडामध्ये भरधाव थारने स्कूटरला उडवले; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Margao Municipal Land Dispute: ₹14.12 कोटींच्या पालिका मालमत्तेवरून वाद; बीपीएस स्पोर्ट्स क्लबच्या जमिनीप्रकरणी 'कॅव्हिएट' दाखल

OTP Banking Fraud: 'ओटीपी' शेअर केला अन् 80 हजार 855 रुपये गेले; बँकेविरोधातील ग्राहकाची तक्रार आयोगाने फेटाळली

SCROLL FOR NEXT