Doris Texerab

 

Dainik Gomantak 

गोवा

27 वर्षे आमदार असूनही दिगंबर कामत यांचे मडगाव 'अविकसीतच'!

दिगंबर कामत (Digambar Kamat) हे मागची 27 वर्षे माडगावचे आमदार असूनही त्यांच्याकडून माडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही.

दैनिक गोमन्तक

मडगाव: दिगंबर कामत हे मागची 27 वर्षे माडगावचे आमदार असूनही त्यांच्याकडून माडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही. त्यामुळे मडगाव गोव्याची आर्थिक राजधानी असूनही विकासाच्या बाबतीत मागेच राहिली असा आरोप मडगावच्या माजी नगराध्यक्ष आणि मडगाव (Margao) काँग्रेस मंडळाच्या माजी अध्यक्ष डोरिस टेक्सेरा (Doris Texerab) यांनी केला.

सध्या तृणमुल पक्षात प्रवेश केलेले कामत (Digambar Kamat) यांचे पूर्वीचे समर्थक डोरिस टेक्सेरा आणि नगरसेवक महेश आमोणकर (Mahesh Amonkar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कामत यांच्यावर आरोप केले. मडगावची कामत यांनी कशी वाट लावली हे मडगाव रेल्वे स्थानक परिसराला भेट दिल्यावर कळून येते. मडगाव हे गोव्यातील प्रमुख जंक्शन असतानाही त्याला ओंगळवाणे स्वरूप आले आहे ते पाहिल्यास मडगावकरांना लाजेने मान खाली घालावी लागते असे त्या म्हणाल्या. मडगाव ही गोव्याची (Goa) आर्थिक राजधानी असुनही या शहरात चांगले मर्केट नाही, चांगले उद्यान नाहीं, मैदानावर पुरेशा सोयी नाहीत, पार्किंगची व्यवस्था चांगली नाही. एव्हढेच नव्हे तर पुरेशा सौचालयांचीही सोय नसल्याने लोकांना त्रास सोसावे लागत असल्याचा आरोप केला.

शिवाय, महेश आमोणकर यांनी कामत यांनी मडगावकडे दुर्लक्ष केल्याने फातोर्ड्याचा विकास झाला असा आरोप करून कामत यांच्याकडे मुस्लिमांच्या कब्रस्थानचा प्रश्नही सुटू शकला नाही असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT