Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastari Accident Case: मेघना सावर्डेकरच्या जबान्यांमध्ये तफावत

बाणस्तारी अपघात: परेशविरोधात पुरेसे पुरावे

दैनिक गोमन्तक

बाणस्तारी अपघातप्रकरणी मर्सिडीज कार मालकीण मेघना परेश सिनाय सावर्डेकर हिने पोलिसांसमोर तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबान्यांमध्ये क्राईम ब्रँच तपास अधिकाऱ्याला विसंगती आढळून आली आहे.

अपघात झाला तेव्हा पती परेश कार चालवत होता, हे दोन्ही जबान्यांत साम्य असले तरी या अपघाताबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांमसोर दिलेल्या जबानीत दुचाकीने कारला धडक दिल्याचे सांगितले. मात्र, असे असले तरी त्याचा परिणाम तपासावर होणार नाही. न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याइतपत पुरावे संशयित परेशविरुद्ध आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या अपघातप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी मेघना व तिच्या मुलांचा घरी जाऊन सीआरपीसी १६१ अन्वये जबानी नोंद केली होती.

त्यावेळी मेघनाने कार परेश चालवत होता व समोरून येणाऱ्या दुचाकींना कारने धडक दिली असे सांगितले तरी अपघातानंतर ती चालकाच्या आसनावर कशी पोहचली, याबाबत तिने काहीच उत्तर दिलेले नव्हते.

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कलम १६४ अन्वये दिलेल्या जबानीत परेश कार चालवत होता व समोरून आलेल्या दुचाकीने कारला धडक दिली. त्यामुळे कारमधील एअरबॅग खुल्या झाल्या व समोर काहीच दिसेनासे झाले. ती चालकाच्या बाजूला असलेल्या आसनावर बसली होती. अपघात होताच ती उसळून पुढील आसनाच्या मधोमध आली. चालक आसनावरून परेश उतरला व त्यानंतर ती चालक आसनावर बसल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यासमोर सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT