Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोली शहरातील रस्ते खड्डेमय, चालकांसह पादचाऱ्यांनाही नाहक मनस्ताप; वाहनांचेही होतंय नुकसान

Bicholim Road Issue: शहरातील रस्त्यांची सध्या बिकट अवस्था झाली असून, भर पावसात या खड्डेमय रस्त्यांमधून वाट काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे.

Sameer Amunekar

डिचोली: शहरातील रस्त्यांची सध्या बिकट अवस्था झाली असून, भर पावसात या खड्डेमय रस्त्यांमधून वाट काढताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे.

कदंब बस स्थानकाकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्यासह बोर्डे येथे मुख्य रस्ता, भायली पेठ, सोनार पेठ येथील रस्त्यांची वाताहत झाली आहे. या रस्त्यांवर सुरुवातीला लहान खड्डे पडले होते. मात्र, आता पावसाच्या पाण्यामुळे आणि रहदारीमुळे हे रस्ते रुंदावले आहेत.

पावसावेळी हे खड्डे पाण्याने भरत असून, त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. बऱ्याचदा या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. खड्डयांमुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत असून दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघातही होत आहेत. वाहने जाताना खड्ड्यांमधील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडण्याचे प्रकारही वाढले असून, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जलवाहिनींसाठी खोदलेले चर घातक

नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी शहरातील बहुतेक रस्ते खोदले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू करतानाच अवकाळी पाऊस आणि नंतर हंगामी पावसाला सुरवात झाली.

त्यामुळे चर बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे काम करण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रस्त्यांची वाईट स्थिती झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारीही मान्य करत आहेत. पाऊस कमी होताच रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT