GCA Premier League  Dainik Gomantak
गोवा

GCA Premier League: धेंपो, जीनो क्लब वर्चस्वाच्या दिशेने

लक्षयचा धडाका, मोहित भेदक, योगेश-वैभवची शतकी भागीदारी

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

GCA Premier League जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून सुरवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी धेंपो क्रिकेट क्लबने चौगुले स्पोर्टस क्लबवर, तर गतविजेत्या जीनो क्लबने पणजी जिमखान्यावर वर्चस्व राखण्याच्या दिशेने वाटचाल केली.

पर्वरी येथील जीसीए मैदानावर कर्णधार लक्षय गर्ग याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे धेंपो क्लबने 234 धावा केल्या. कर्णधार लक्षय गर्गने 70 चेंडूंत 12 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावा केल्या. चौगुलेचा फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याने 103 धावांत 7 गडी बाद केले. दिवसअखेर चौगुले क्लबची 4 बाद 79 अशी स्थिती होती. ते अजून 155 धावांनी मागे आहेत.

सांगे येथील जीसीए मैदानावर योगेश कवठणकर व वैभव नाईक यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 125 धावांच्या भागीदारीमुळे जीनो स्पोर्टस क्लबने पणजी जिमखान्याविरुद्ध 6 बाद 277 धावा केल्या. योगेश 89 धावांवर नाबाद आहे. त्याने 204 चेंडूंतील खेळीत 12 चौकार मारले. वैभवने 118 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 71 धावा नोंदविल्या.

संक्षिप्त धावफलक

सांगे मैदानावर ः जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः 90 षटकांत 6 बाद 277 (सनथ नेवगी 37, योगेश कवठणकर नाबाद 89, वैभव नाईक 71, शिवेंद्र भुजबळ 37, ऋत्विक नाईक 2-69, शुभम देसाई 2-68) विरुद्ध पणजी जिमखाना.

पर्वरी मैदानावर ः धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 57.7 षटकांत सर्वबाद 234 (मंथन खुटकर 36, यश पोरोब 34, लक्षय गर्ग नाबाद 90, मोहित रेडकर 25-3-103-7). चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः 26 षटकांत 4 बाद 79 (कश्यप बखले नाबाद 23, दीप कसवणकर 2-32, विकास सिंग 2-35).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अडीच वर्षीय मुलीच्या खूनप्रकरणी 'मास्टरमाईंड'ला 7 दिवसांची पोलिस कोठडी, संशयित बंगळूरुतून अटकेत; डिचोली पोलिसांची कारवाई

Suryakumar Yadav: 'मिस्टर 360, माझी मदत कर...' सूर्यकुमार यादवने डिव्हिलियर्सकडे मागितली मदत, फलंदाजीत होणार मोठे बदल?

Shocking: क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिट'

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

SCROLL FOR NEXT