Dharmesh Saglani arrested in alleged ransom case  Dainik Gomantak
गोवा

कथित खंडणी प्रकरणी धर्मेश सगलानी पोलिसांच्‍या ताब्‍यात

निवडणुकीच्‍या काळापासूनच सगलानी हे कथित खंडणी प्रकरणी पोलिसांच्‍या निशाण्‍यावर होते

दैनिक गोमन्तक

पणजी : साखळी मतदारसंघातील काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते धर्मेश सगलानी यांना एका कथित जुन्‍या खंडणी प्रकरणी आगशी पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. नुकत्‍याच संपलेल्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या काळापासून सगलानी यांच्‍याभोवती हा पोलिसांचा ससेमिरा लागला आहे.

साखळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवताना धर्मेश सगलानी (Dharmesh Saglani) यांनी भाजपचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना घाम फोडला होता.

काही राजकीय विश्‍‍लेषकांनी तर साखळीत (Sanquelim) सगलानीच बाजी मारून ‘किंग मेकर’ ठरणार असल्‍याचे भाष्‍य केले होते. त्‍यांना मतदारसंघात मिळणार प्रतिसाद पाहिल्‍यास अनेकजण त्‍यांच्‍या विजयाची खात्री व्‍यक्त करत होते. मतमोजणी दिवशीही सगलानी यांनी पहिल्‍या टप्‍प्‍यात सावंत यांना पिछाडीवर टाकले होते. पण नंतर जोरदार मुसंडी मारत प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी अवघ्‍याच मतांनी सगलानी यांचा पराभव केला होता. पण या निवडणुकीच्‍या काळापासूनच सगलानी हे कथित खंडणी प्रकरणी पोलिसांच्‍या (police) निशाण्‍यावर आले होते. आज पुन्‍हा एकदा त्‍यांना आगशी पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून गुन्‍हा शाखेच्‍या कार्यालयात चौकशी होण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT