Dhargal Flyover Project Dainik Gomantak
गोवा

Dhargal Flyover Project: उड्डाणपूल बांधकामाचा वाहकांना फटका; धारगळ मार्गावर वाहतूक विस्कळीत, उपाययोजनांची मागणी

Dhargal Two Khamb Flyover: धारगळ-दोन खांब येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून दररोज हजारो वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे: धारगळ-दोन खांब येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून दररोज हजारो वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून स्थानिक नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गोवा-महाराष्ट्र सीमेच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील हा महत्त्वाचा भाग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या वाहतूक वळणांमुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे येथे दररोज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. अनेक वाहनचालकांना काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अर्धा ते एक तास खर्च करावा लागत असल्याचे चित्र आहे.

स्थानिकांच्या मते, संबंधित कंत्राटदाराने प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सक्षम वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला नसल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. बांधकामस्थळी पर्यायी सेवा रस्त्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. उपलब्ध असलेले वळण मार्ग अरुंद असून पावसामुळे त्यांची अवस्था आणखी खराब झाली आहे. त्यामुळे वाहनांची गती मंदावून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

तुये परिसरातील अरुंद मार्ग हा आणखी एक अडथळा ठरत असून तेथे निर्माण होणारा वाहतुकीचा अडसर संपूर्ण परिसरातील वाहनचळवळीवर परिणाम करीत आहे. या मार्गावरून रुग्णवाहिका, शालेय बस आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही कोंडीत अडकून पडावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

वाहतूक नियोजन करा

नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रभावी वाहतूक नियोजन करावे, सेवा रस्ते सक्षम करावेत तसेच वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे, अशी मागणी केली आहे. विकासकामे निश्चितच आवश्यक असली तरी ती जनतेच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करणारी ठरू नयेत, अशी भावना वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रोजची डोकेदुखी!

उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा असली, तरी तोपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या मात्र धारगळ-दोन खांब येथील वाहतूक कोंडी हा प्रवाशांसाठी रोजचाच डोकेदुखीचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT