Pre Monsoon Works: कुर्टीतील प्रभाग 7 मधील गटाराचे बांधकाम आणि सफाईचे काम जोरात सुरू; मान्सूनपूर्व विकासकामांना मिळाली गती

Curti Khandepar Panchayat Development Works: कुर्टी - खांडेपार पंचायतक्षेत्रातील प्रभाग क्रमांक सातमधील गटाराचे बांधकाम आणि सफाईचे काम जोरात सुरू आहे.
Curti Khandepar Panchayat Development Works
Pre Monsoon WorksDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुर्टी - खांडेपार पंचायतक्षेत्रातील प्रभाग क्रमांक सातमधील गटाराचे बांधकाम आणि सफाईचे काम जोरात सुरू आहे. मान्सूनपूर्व विकासकामांतर्गत हे काम स्थानिक पंचसदस्य बाबू च्यारी यांनी हाती घेतल्यानंतर या कामाला वेग आला.

या भागात गटार बांधकामासाठी मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढाकार घेतल्यामुळे हे कामही सुरू आहे. मागचा बराच काळ हे काम रखडले होते, पण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांनी पाठपुरावा केल्यानंतर ढवळीकर यांनी स्वतः हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले आणि त्यासंबंधीची कार्यवाही केली आहे.

Curti Khandepar Panchayat Development Works
Goa Water Metro Project: गोव्यात 'वॉटर मेट्रो'चे वारे! पर्यटन आणि स्थानिक वाहतुकीसाठी ठरणार गेम चेंजर; कोची मेट्रोच्या टीमचे मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन

या प्रभागातील काही गरजूंची मोडकळीस आलेल्या घरांचे बांधकाम तसेच छप्पर दुरुस्तीचे काम सुदिन ढवळीकर यांच्या मार्फत करण्यात आली असून ऐन पावसाळ्यात हे काम झाल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com