Dr. Pramod Sawant
Dr. Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Dr. Pramod Sawant : विधानसभेपूर्वी धनगर समाजाला ‘एसटी’चा दर्जा देणार- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

अती मागासलेला समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिले जात आहे. या समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा सर्वात आधी मिळायला हवा होता. आगामी विधानसभा निवडणुकपूर्वी या समाजाला एसटी दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. तसेच धनगर समाजाने आपली भाषा लिखित स्वरूपात ठेवणे आवश्यक असून समाजातील संस्कृती, परंपरा टिकून ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अखिल गोवा धनगर समाजाचा १७ वा वर्धापन दिन वालकिणी येथे साजरा झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजकल्याणमंत्री सुभाष फळ देसाई, खासदार विनय तेंडुलकर, धनगर समाजाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, वासुदेव मेंग गावकर, सुरेश केपेकर, सदा डोईफोडे, उपसरपंच राम पांढरमिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

वन हक्क कायद्यानुसार खंडित असलेले खटले आता परत एकदा मार्गी लावण्यात येतील. आगामी पाच वर्षांत एकही कमकुवत घटक घराच्या जमिनीसाठी वंचित राहणार नाही. याची काळजी सरकारने घेतली असून कालांतराने इतर जमिनीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यसभेत धनगर बांधवाना एसटी दर्जा मिळावा म्हणून विषय मांडला. आता डबल इंजिन सरकार असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला न्याय मिळेल, असा विश्‍वास आहे.

- विनय तेंडुलकर, राज्यसभा खासदार

समाजाच्या हितासाठी सरकारी जमिनीचा वापर करून समाज भवन बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिले जाईल. समाजाचे अडलेले प्रश्न मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मूलभूत सुविधा, आवश्यक गरजा पुरविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री

मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून सर्व प्रकारचे अहवाल तयार करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. आजही खेड्यापाड्यात धनगर समाज कशा पद्धतीने जीवन जगत आहे, त्याचे दाखले सर्व स्तरांवर मांडले आहे. गरज पडल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून व्यथा मांडली जाईल.

-बाबू कवळेकर, धनगर समाजाचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT