Deviya Rane on Tiger Reserve Dainik Gomantak
गोवा

Deviya Rane on Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्प झाल्यास तब्बल 15 हजार लोकांवर परिणाम होण्याची शक्यता!

आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वनमंत्री विश्वजित राणे यावर योग्य तो निर्णय घेतील : देविया राणे

दैनिक गोमन्तक

म्हादई वन्यजीव अभयारण्य व आजूबाजूचा परिसर व्याघ्रक्षेत्र म्हणून तीन महिन्यांत अधिसूचित करण्याचा महत्त्‍वपूर्ण निवाडा काल (24 जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. अनुसूचित जमातींचे हक्क व इतर वनवासींचे दावे 12 महिन्यांच्या आत निकालात काढावेत, असेही दिशानिर्देश देण्‍यात आले आहेत. सरकारसाठी हा चांगलाच दणका होता. यानंतर राजकीय वर्तुळात मत-मतांतरांना सुरुवात झाली आहे.

यावर पर्येच्या आमदार देविया राणे यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, कोर्टाने दिलेला हा निर्णय जनतेच्या बाजूने नाही. जर गोव्यात व्याघ्र प्रकल्प झाला तर त्याचा एक-दोन नव्हे तर तब्बल 15 हजार लोकांवर परिणाम होणार आहे.

म्हादई ते खोतीगाव मधील ग्रामस्थांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वनमंत्री विश्वजित राणे यावर योग्य तो निर्णय घेतील.

उच्च न्यायालयाने निवाड्यात दिलेले निर्देश असे...

  1. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ३८ व्ही (१) नुसार सरकारने म्हादई अभयारण्य व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारिणीने (एनटीसीए) नमूद केलेला परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून ३ महिन्यांत अधिसूचित करा.

  2. कायद्यानुसार व्याघ्र संवर्धन आराखडा तयार करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलावीत. व्याघ्र क्षेत्र अधिसूचित केल्यापासून तीन महिन्यांच्या आत हा आराखडा एनटीसीएला सादर करा.

  3. राज्य सरकारला व्याघ्र संवर्धन आराखडा जलदगतीने तयार करण्यासाठी एनटीसीएने पूर्ण सहकार्य करावे. हा आराखडा तयार झाल्यानंतर सरकारने व्याघ्र संवर्धनासंदर्भात तीन महिन्यांत निर्णय घ्यावा.

  4. वाघांच्या हालचाली व अधिवास असलेल्या ठिकाणी शिकारविरोधी केंद्रे स्थापन करावी व तेथे टेहळणी पथके तैनात करण्यात यावीत. ही प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करावी.

  5. व्याघ्रक्षेत्र अधिसूचना जारी करण्यात येईपर्यंत वन्यजीव अभयारण्यात तसेच नॅशनल पार्क क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अतिक्रमणे येणार नाहीत यासाठी तातडीने पावले उचलावीत.

  6. अनुसूचित जमातींचे हक्क व इतर वनवासींचे दावे आजपासून १२ महिन्यांच्या आत निकालात काढावेत. वन्यजीवांचा अधिवास असलेल्या गावांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT