Goa Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात विकासकामांचा धडाका! 'नोकरी घोटाळा' बाबतीत आमदार नाईक म्हणाले की..

Ravi Naik: फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असून विकासकामांची प्रक्रिया सुरूच आहे. याकामी सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Ravi Naik Ponda Development

फोंडा: फोंडावासीयांना चांगले ते देण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असून विकासकामांची प्रक्रिया सुरूच आहे. याकामी सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील प्रभाग नऊमधील सुन्नी शाही मदिना मशिदीजवळील संरक्षक भिंत व नाल्याचे काम तसेच छोटा पदपूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी रवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक, नगरसेवक रूपक देसाई, कुर्टी-खांडेपारचे सरपंच अभिजीत गावडे, स्थानिक पंचसदस्य साजिदा सय्यद, पंचसदस्य नीळकंठ नाईक, हरेश नाईक तसेच मशिदीशी संबंधित अब्बास मुल्ला, इतर नागरिक, अभियंता शैलेश नाईक व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक पंचसदस्य साजिदा सय्यद म्हणाल्या की, कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांच्यामुळेच विकासकामे होत असून येथील संरक्षक भिंत तसेच इतर कामांबद्दल आपण रवी नाईक यांच्याशी बोलले होते, त्यांनी लगेच सहकार्याचा हात पुढे केला. याशिवाय माजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही विकासकामांबद्दल आवश्‍यक सहकार्य केले. यावेळी साजिदा सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

विकासकामे जोरात...

फोंडा मतदारसंघातील फोंडा पालिका आणि कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील विविध विकासकामे सध्या जोरात सुरू आहेत. फोंडा पालिका क्षेत्रातील उद्यान तसेच मार्केट संकुलाचे काम येत्या महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय पंचायत क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती यावेळी नगरसेवक तसेच पंचसदस्यांनी दिली.

‘कॅश फॉर जॉब’; तपास योग्य दिशेने!

रवी नाईक यांना कॅश फॉर जॉब प्रकरणाविषयी विचारले असता त्यांनी या प्रकरणांचा तपास योग्य दिशेने सुरू असून पोलिस आवश्‍यक ती माहिती गोळा करीत आहेत. ही माहिती हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई होणारच आहे. त्यासंंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीरपणे सांगितले आहे, त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई होईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT