Poinguinim Panchayat meeting Dainik Gomantak
गोवा

पोटके मैदानाचा तीन कोटी खर्चून विकास...?

निविदा प्रक्रिया मार्गी: पैंगीण ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैंगीण पंचायतीच्या रविवार झालेल्या ग्रामसभेत पोटके क्रीडा मैदान, कचरा प्रक्रिया प्रकल्पावर चर्चा झाली. पंचायत क्षेत्रातील पोटके क्रीडा मैदानाचा विकास तीन कोटी रूपये खर्चून आदिवासी कल्याण योजनेखाली करण्यात येणार आहे. त्यासबंधीची फाईल खात्याकडे निविदा जारी करण्यासाठी पाठविण्यात आली आहे. याबाबत सभापती रमेश तवडकर यांच्याशी पंचायत मंडळाने चर्चा केली आहे, असे पंच प्रवीर भंडारी यांनी ग्रामसभेत सांगितले.

ग्रामसभेने पंचायत सदस्य भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पोटके क्रीडा मैदान विकास समिती स्थापन केली होती. या समितीने प्रयत्न करून ही जमीन पैंगीण पंचायतीच्या नावावर करून घेतली. मात्र, जमीन नावावर नसताना अनेकदा या मैदानाची पायाभरणी झाली. ग्रामसभेत सभापती तवडकर यांच्या सहकार्याने आदिवासी कल्याण खात्याच्या तीन कोटी अर्थ सहाय्याने मैदानाचा पहिल्या टप्प्यात विकास करण्याचे मत माजी उपसरपंच सतीश पैगीणकर तसेच व्यंकटराय नाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी दीपक बोवाळकर व सुनिल गावकर यांनी सार्वजनिक जैवविविधता अहवालासबंधी दृक श्राव्य माध्यमातून माहिती दिली.

कचरा प्रकल्प स्थलांतर लवकरच !

पंचायतीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प ज्या जागी उभारण्यात आला आहे, तो स्थलांतरीत करून त्या जागेबद्दल पर्यायी 15 हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याचे पैंगीण कोमुनिदाद संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेत सांगितले होते. त्याप्रमाणे नऊ हजार चौरस मीटर जागा कोमुनिदाद संस्थेने पंचायतीला दिली आहे. मात्र, अद्याप सहा हजार चौरस मीटर जमिनीसंदर्भात चर्चा चालू असल्याचे पंच सदस्यांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

SCROLL FOR NEXT