Goa Student Dainik Gomantak
गोवा

Goa Student: विकसित विद्यार्थीच देशाचे भवितव्य घडवणार!

Goa Student: प्रा. श्रीकृष्ण अभ्यंकर: कवळेतील शांतादुर्गा गुरुकुलात चिंतन शिबिराला प्रतिसाद

दैनिक गोमन्तक

Goa Student:

विकसित विद्यार्थी हाच देशाचे भवितव्य घडविणार त्यामुळे पंचकोश विकसन म्हणजे काय? आजच्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण वाढ का होत नाही? हे लक्षात घेऊन विद्यार्थिदशेतूनच विद्यार्थ्याचा पूर्ण विकास होणे फार गरजेचे असते, असे प्रतिपादन ज्ञान प्रबोधिनी गुरुकल निगडीचे प्रा. श्रीकृष्ण अभ्यंकर यांनी केले.

कवळे - फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिक्षण समितीच्या शांतादुर्गा गुरुकुल येथे रविवारी आयोजित करण्यात आलेली पंचकोश प्रणालीवर चिंतन परिषद यशस्वीरीत्या पार पडली. या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले ते पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल निगडी येथील प्रा. आदित्य शिंदे व प्रा. श्रीकृष्ण अभ्यंकर यांचे पंचकोश विकसन विषयावरील वैचारिक मार्गदर्शनपर व्याख्यान.

प्रत्येक कोश विकासित करण्यासाठी कोणकोणते उपक्रम गुरुकुलकडून राबवले जातात, त्यासाठी कशाप्रकारे व्यवस्था असते व त्याचे आयोजन यासंबंधी प्रा. आदित्य शिंदे यांनी सांगितले.

ज्ञानप्रबोधिनी निगडी गुरुकुलचे दोन शिष्य कु. आदित्यराज आरावडे व कु. आर्य थोरवे यावेळी उपस्थित होते.

श्री शांतादुर्गा देवीच्या तसबिरिला पुष्षहार वाहून; नंतर गुरुकुलाच्या विद्यर्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने परिषदेला सुरुवात झाली. यावेळी श्री शांतादुर्गा शिक्षण समिती गुरुकुल चे अध्यक्ष श्रीकुमार सरज्योतिषी, श्री शांतादुर्गा शिक्षण समिती गुरुकुल चे उपाध्यक्ष नारायण नावती, गुरुकुल ‘पीटीए’चे अध्यक्ष सागर तारी उपस्थित होते.

गुरुकुलचे माजी विद्यार्थी ऐश्वर्या गाड, मनस्वी सावंत, सात्विक सरज्योतिषी, प्रथम नाईक, कुलदीप सावंत, निरज देसाई तथा सिया सरज्योतिषी यांनी मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT