Goa Teacher Recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa Teacher Recruitment: पारदर्शकपणे नोकऱ्या देण्यात गोवा देशात अव्वल; CM प्रमोद सावंतांचे प्रतिपादन, राज्यातील 222 प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीपत्रे केली प्रदान

Teachers role in shaping new generation: विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोवा घडविण्यासाठी नव्या पिढीला घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विकसित भारत आणि स्वयंपूर्ण गोवा घडविण्यासाठी नव्या पिढीला घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. २२२ शिक्षकांची नेमणूक ही कर्मचारी निवड आयोगामार्फत पारदर्शकपणे आणि गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली; परंतु अजूनही काहीजण ‘तुम्हाला वशिल्याने नोकरी देतो’, असे सांगतात. मात्र, पारदर्शक नोकऱ्या देण्यात गोवा देशात अव्वल ठरल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राज्यातील २२२ प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की प्राथमिक शाळेत निवड केलेल्या शिक्षकांपैकी ९० टक्के महिला आहेत.

महिलांमध्ये निसर्गत:च लहान मुलांना जपणे, प्रेम देणे आणि योग्य संस्कार करण्याचे गुण असतात, असे ते म्हणाले. राज्यात प्राथमिक शिक्षकांची कमतरता होती. शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असल्यास त्या योग्य प्रकारे चालू शकत नाहीत. आज २२२ शिक्षकांची नेमणूक केली, त्याचा मला आनंद असून मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे झिंगडे यांनी सांगितले.

पॅरा शिक्षकांच्या समस्या सोडविणार

राज्यातील शिक्षण व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी सरकारी शाळांना साधनसुविधा पुरविल्या आहेत. अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे वेतन, भाडे, डागडुजीचा खर्च, बालरथ अशा सर्व सुविधा सरकारकडून पुरविल्या जातात. सर्व प्रकारचे फंड माझ्या कार्यकाळात वेळेत देण्यात आले.

समग्र शिक्षा अभियान आणि पॅरा शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत, त्याही ऑक्टोबरपर्यंत सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिक्षक नेमणुकीसाठी २ वर्षांच्या अनुभवाची जी अट घातली आहे, तिचा लाभ त्यांना होईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

कोकणी लिखाणात शिक्षक पिछाडीवर

राज्यातील २२२ पैकी २०१ शिक्षक हे मराठी प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहेत. त्यांची मराठी भाषेतून परीक्षा घेण्यात आली. जे कोकणी माध्यमातून शिकवणार आहेत, त्यांची कोकणीतून परीक्षा घेतली. मराठीला डावलल्याची टीका यापूर्वी करण्यात आली; परंतु वस्तुस्थिती तशी नाही. मराठीचे शुद्धलेखन आणि वाचनावर भर देणे गरजेचे आहे. तर कोकणी शिक्षकांना कोकणीत योग्यप्रकारे लिहिता येत नाही. आजच्या युगात कोकणी आणि मराठीसोबतच इतर भाषांचेही ज्ञान असणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT