World Hindi Day X
गोवा

World Hindi Day: कोकणी राज्यात वाढतोय 'हिंदी'चा वापर

Vishwa Hindi Diwas: गोमंतकीयांची मातृभाषा कोकणी असली तरी गोव्यातही हिंदी भाषिक किंबहुना हिंदीतून संवाद साधणे ही काळाची गरज बनल्याचे दिसून येत आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: १० जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी भाषा आणि तिचा वापर वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९७५ मध्ये नागपूर येथे पहिली जागतिक हिंदी परिषद झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हिंदीच्या संवर्धनासाठी दरवर्षी १० जानेवारीला हिंदी दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. ‘सर्वांना समजणारी भाषा’ अशी तिची ओळख. विशेष म्हणजे, हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली जाणारी एक भाषा. व्यापारापासून करमणुकीपर्यंतच्या सर्वच क्षेत्रांत हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आपोआपच तिला अर्थकारणाशी जोडले जाते.

उत्तर भारतात हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. गोमंतकीयांची मातृभाषा कोकणी असली तरी गोव्यातही हिंदी भाषिक किंबहुना हिंदीतून संवाद साधणे ही काळाची गरज बनल्याचे दिसून येत आहे. तसेही देशातील सुमारे ७५ टक्के लोक हिंदी बोलू शकतात, असे आकडेवारी सांगते.

मुळात एकमेकांच्या भावनांची देवाण-घेवाण करण्यासाठीचे माध्यम म्हणजे भाषा. गोव्याची राजभाषा कोकणी असली तरी आजही येथील दुकानांमध्ये विशेषतः उडपी, मारवाडी, सिंधी दुकानदारांच्या व्यतिरिक्त गोमंतकीय दुकानांत देखील काम करणारा मजूरवर्ग हा बिगरगोमंतकीयच आहे. हे कामगार अधिकतर हिंदीतच बोलतात. मग स्थानिक लोक त्यांच्या सोयीनुसार हिंदीतून बोलतात.

गोव्यात अनेक मारवाडी लोकांची दुकाने आहेत. यातील काहींना बऱ्यापैकी कोकणी बोलता येते. अशावेळी संवादाची भाषा बनते हिंदी. घरगुती कामे करून घ्यायची असल्यास मजूरवर्ग बोलावला जातो, तो देखील हिंदीतूनच बोलतात. उत्तर प्रदेश, गुजराती, ओडिशा, महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड, हरयाणा, राजस्थान, दिल्ली आदी भागांतील लोक गोव्यात वास्तव्य करून आहेत.

यातील बहुसंख्य लोक हे व्यापार किंवा रोजगारानिमित्त गोव्यातच स्थायिक झालेले दिसतात. या लोकांना कोकणी भाषा बोलायला तितकीशी जमत नाही. किंबहुना उच्चार व बोली भाषेवरून तो बिगरगोमंतकीय हे समजता येते. परिणामी, ते लोक व्यवहारासाठी हिंदीमध्ये बोलण्यास प्राधान्य देतात.

केशकर्तनालय, वाहन उपकरणे दुकान, मोबाईल शॉपी, मासळी मार्केट, चिकन शॉप आदी बहुतांश सर्वच आस्थापने हिंदी भाषिक किंवा इतर बिगरकोकणी भाषिक चालवतात. मग स्थानिक व या दुकानदारांचे बोलण्याचे माध्यम असते हिंदी. गोवा हा समुद्रकिनाऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जो पर्यटक गोव्यात दाखल होतो, तो येथील दुकानदार किंवा खरेदी-विक्रीसाठी हिंदी भाषेचाच वापर करतो. येथील शॅक्‍समध्ये काम करणारे कर्मचारी किंवा मालकवर्गही पर्यटकांसोबत हिंदीत बोलतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT