Manish Jadhav
हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे.
भारत आणि त्याच्या आसपासच्या अनेक देशांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते. एवढेच नाही तर हिंदी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
जगभरात हिंदीचे महत्त्व वाढवण्यासाठी, दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. तर दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो.
यंदा जागतिक हिंदी दिन 2025 ची खास थीम काय आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया?...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये पहिले जागतिक हिंदी संमेलन आयोजित केले होते, ज्यामध्ये 30 देशांतील 122 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. ही परिषद महाराष्ट्रातील नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत हिंदीला जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक म्हणून मान्यता देण्यावर आणि आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये तिचा वापर वाढवण्यावर चर्चा झाली होती.
10 जानेवारी 2006 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच जागतिक हिंदी दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.
यंदा जागतिक हिंदी दिनाची थीम 'एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज' अशी ठेवण्यात आली आहे. ज्याचा उद्देश भाषिक आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देणे आहे.