Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: प्रभारीपद मिळाले असले तरी, लोकसभा लढवण्याची तयारी!

Girish Chodankar: चोडणकर : ईशान्येकडील चार राज्यांची जबाबदारी सांभाळणार

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: कॉंग्रेस पक्षाने चार राज्यांचे प्रभारीपद दिले, याचा अर्थ मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुकांच्या यादीतून बाहेर गेलो, असा होत नाही. मणिकम टागोर यांच्यासह काही खासदारांकडेही पक्षाने राज्य प्रभारीपद सोपवले याकडे दुर्लक्ष नको, असे त्रिपुरा, सिक्कीम, मणिपूर आणि नागालॅण्ड या राज्यांचे प्रभारीपद मिळालेल्या गिरीश चोडणकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

चोडणकर म्हणाले की, पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढवा, असे सांगितले तर मी निवडणूक लढवण्यास आजही तयार आहे. प्रभारीपद आणि लोकसभा निवडणुकीची उमेदवारी याचा संबंध नाही. पक्षाने एकाचवेळी चार राज्यांचे प्रभारीपद माझ्याकडे सोपवून मोठी जबाबदारी दिली, याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. आताच मला आदेशाची प्रत मिळाली.

पक्षाचा माझ्यावर मोठा विश्‍वास

चोडणकर म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांत यापूर्वी लुईझिन फालेरो यांनीही काम केले होते. त्यानंतर तशी संधी मला मिळाली आहे. पक्षाने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील. यामुळे माझे मन भारावून गेले आहे. वर्षातच मी त्या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT