Drink And Drive: रात्रीच नव्हे, राज्यात दिवसाही ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’

Drink And Drive: 26 मद्यपी चालकांवर बडगा : पर्यटकांसह स्थानिकांकडूनही वाहतूक नियम धाब्यावर
Drink And Drive checking at Dabolim Airport two booked
Drink And Drive checking at Dabolim Airport two bookedDainik Gomantak
Published on
Updated on

Drink And Drive: केवळ रात्रीच चालक मद्यपान करून वाहन चालवतात असे नाही, तर दिवसाही मद्यपान करून वाहन चालवण्याचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या मोहिमेतून दिसून आले आहे. शुक्रवारी दिवसा तब्बल 26 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तर रात्री 18 मद्यपी चालक वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणीत सापडले, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Drink And Drive checking at Dabolim Airport two booked
Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्‍नचिन्ह

सध्या मद्यपी वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर कौशल म्हणाले की, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे अपघात होऊ नयेत, यासाठी ही मोहीम तीव्र केली आहे.

पोलिसांचे ठोकताळे चुकले

सध्या वाहनचालकांनी मद्यप्राशन केले आहे का, याच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शक्यतो रात्रीच्यावेळी मद्यपी वाहनचालक सापडतील, असा तर्क असतो; पण शुक्रवारी दिवसभरात २६ मद्यपी वाहनचालक आढळले. ते चालक केवळ पर्यटक होते, असे म्हणता येणार नाही. स्थानिकही वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, असे कौशल म्हणाले.

सेतूवरही स्थानिकांचा संचार

अटल सेतूवरून दुचाकी वाहतुकीस बंदी आहे. तीव्र वाऱ्याच्या झोतामुळे दुचाकीस्वार नदीत पडतील, अशी प्रशासनाला भीती वाटते. त्यामुळे ही बंदी घातली आहे. असे असूनही त्याचे उल्लंघन केले जाते आणि त्यात स्थानिकांचे प्रमाणही बऱ्यापैकी असते, असे दिसून आले आहे, असे अक्षत कौशल यांनी सांगितले.

140 वाहने जप्त

खासगी गाड्या भाड्याने देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. अशा वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस वाहतूक खात्याला केली जाते. अशा प्रकारची १४० वाहने ताब्यात घेतली आहेत. पणजीत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिस तैनात केले अाहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com