Deputy Collector assured to provide Drinking water supply to Kudchire village
Deputy Collector assured to provide Drinking water supply to Kudchire village Dainik Gomantak
गोवा

कुडचिरेतील पाणीप्रश्न खदखदण्यापूर्वीच थंडावला

दैनिक गोमन्तक

डिचोली: वन-म्हावळींगे पंचायत क्षेत्रातील कुडचिरे गावात तापलेला पाणीप्रश्न अखेर खदखदण्यापूर्वीच थंड झाला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी शिष्टाई आणि कुडचिरे गावात सुरळीत पाणी पुरवठा करण्याची ग्वाही मिळाल्यानंतर कुडचिरेतील संतप्त नागरिकांनी अखेर माघार घेतली. त्यामुळे नवीन जोड जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडचिरे गावातील जलवाहिनीला जोडून धनगरवाडामार्गे वाठादेवपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, यामुळे कुडचिरे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊन भविष्यात पाण्यासाठी मारामारी होणार. या भीतीने कुडचिरेतील नागरिकांचा गावातील जलवाहिनीला नवीन जलवाहिनी जोडण्यास विरोध होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेताना रस्त्यावर उतरून गुरुवारी सायंकाळी जलवाहिनीचे कामही बंद पाडले होते.

काम पुन्हा रोखले

कुडचिरेतील ग्रामस्थांनी काल सायंकाळी जलवाहिनीचे काम अडवले होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी कामाला पुन्हा सुरवात करण्यात आली. मात्र संतप्त ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काम पुन्हा रोखले. पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी आणि ग्रामस्थांमाध्ये यावेळी वादावादीही झाली. घटनेची माहिती मिळताच, डिचोलीचे संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांत करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. अखेर हा प्रश्न डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे नेण्यात आला.

उपजिल्हाधिकाऱ्यांची शिष्टाई सफल

याप्रश्नी दुपारी डिचोलीत उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीस संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक, पाणी पुरवठा खात्याचे सहायक अभियंते दत्तराज पै, पर्यवेक्षक आशिष वझे आणि डिचोली पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक किशोर रामानंद उपस्थित होते. यावेळी स्थानिक उपसरपंच प्रकाश गावकर, पंच उमेश गावकर, पंच सर्वेश उसपकर, माजी पंच भागो वरक यांच्यासह कुडचिरेतील जवळपास 20 ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद महांबरे, भाजप मंडळाचे कृष्णा परब यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत बरीच चर्चा झाली. नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यावरच आम्ही अवलंबून आहोत. असे धनगरवाड्यावरील धनगर बांधवांसह कुडचिरेवासियांनी सांगून, नव्या जलवाहिनीमुळे भविष्यात कुडचिरे पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त केली.

नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नवीन जलवाहिनीमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर अजिबात परिणाम होणार नाही. कुडचिरे गावात सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरूच राहणार. असे पाणी पुरवठ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भविष्यात तसे झालेच, तर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. तसे बैठकीच्या नोंदवहीत नोंद करण्यात आले. भविष्यात पाण्यासंदर्भात समस्या निर्माण झालीच, तर जातीने लक्ष घालण्याची ग्वाही उपजिल्हाधिकारी श्री. वायंगणकर यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतरच कुडचिरेतील ग्रामस्थ्यांनी आपला पवित्रा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रश्नावर पडदा पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT