Goa Election 2022: ‘शिवोली’ ला प्रतीक्षा उद्धारकर्त्याची

भाजप पराभवाचा वचपा काढणार, मायकल लोबोंचीही महत्त्‍वाकांक्षा मोठी काँग्रेस, ‘आप’ सक्रिय : आमदार पालयेकरांना शह देण्यासाठी भाजपची तयारी
Goa Election 2022: ‘शिवोली’ला प्रतीक्षा उद्धारकर्त्याची
Goa Election 2022: ‘शिवोली’ला प्रतीक्षा उद्धारकर्त्याचीDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: मुक्तीनंतर गोवा विकास आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जात असताना शिवोली (Siolim) मतदारसंघ मात्र दिवसेंदिवस मागे मागे सरकत असल्याचे जाणवते. या गोष्टीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आज येथील स्थनिक जनता विचारते आहे. त्याचप्रमाणे, शिवोलीचा कायापालट करण्याची भाषा करणारे राजकारणी सध्या कुठे लपले आहेत, असा संतप्त सवाल त्यांच्याकडून केला जात आहे. येथील मतदार सध्या उद्धारकर्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आमदार या नात्याने शिवोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पां. पु. शिरोडकर, पुनाजी आचरेकर यांच्यापासून ते चंद्रकांत चोडणकर, अशोक नाईक-साळगावकर आणि त्यानंतरचे दयानंद मांद्रेकर व विनोद पालयेकर यांनी केलेले आहे. शिवोलीत अनेक जण सध्या निवडणुकीसाठी सज्ज झाले असल्याचे दिसून येते. दरम्यान, राजकीय क्षेत्राला व्यवसाय-धंद्याच्या स्वरूपात पाहाणाऱ्यांची सुद्धा या भागात कमी नाही. काहींनी स्वतःच्या नावाची नुसती हवा निर्माण करण्यावरही भर दिल्याचे या भागात पाहावयास मिळते आहे.

Dainik Gomantak

अनेक नावे चर्चेत...

अन्य इच्छुक उमेदवारांमध्ये भाजपच्या महिला नेत्या पल्लवी दाभोळकर, स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष तथा समर्थन या सामाजिक संघटनेचे संस्थापक नीलेश वेर्णेकर व काँग्रेसचे राजन घाटे यांची नावे घेतली जातात. आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स, राष्ट्रवादी काँग्रेस, मगो पक्ष यांच्यातर्फे नेमका कोण निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. असे तसले तरी ते पक्ष निवडणूक लढवण्यास प्रयत्नशील आहेत. शिवसेनेने शिवोलीत उमेदवार उभा करण्याचा इरादा व्यक्त करीत जनसंपर्क कार्यालयही सुरू केले आहे. शिवसेनेचे बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट परेरा यांचे नाव विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Goa Election 2022: ‘शिवोली’ला प्रतीक्षा उद्धारकर्त्याची
Goa Election: हळदोणे मतदार संघात टिकलोंसमोर कांदोळकरांचे आव्हान

भाजपमध्ये चुरस

भाजप नेते दयानंद मांद्रेकर हे मागील निवडणुकीतला पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर मंत्री लोबो हे पत्नी दिलायला यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पल्लवी दाभोळकर या भाजपच्या कार्यकर्त्या विविध सामाजिक उपक्रमांतून लोकांपर्यंत पोचल्या आहेत. त्या राज्य महिला कार्यकारिणीवर आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला होता. नंतर स्वतंत्र अर्जही सादर केला होता. मात्र त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी माघार घ्यायला लावली होती. परंतु त्या आता विधानसभेच्‍या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. आजवर या मतदारसंघातून महिला उमेदवाराला संधी मिळालेली नाही. त्यामुळे पर्राच्या सरपंच दिलायला लोबो आणि साळगावकर या मांद्रेकर यांच्या उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात खो घालू शकतात.

Dainik Gomantak

लोबोंचा संचार

या मतदारसंघात पडद्याआडच्या प्रचारात मंत्री मायकल लोबो यांनी बरीच आघाडी घेतलेली आहे. मतदारसंघातील सहा पंचायतींपैकी बहुतांश सरपंच तसेच पंचायत सदस्य सध्या तरी लोबो यांच्याच नावाचा उदोउदो करताना दिसतात. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांना भेटवस्तू देण्याचा सपाटाही त्यांनी लावला आहे. दयानंद मांद्रेकरांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतदारसंघात दौऱ्यावर आले असता, लोबोंच्या शिवोली मतदारसंघातील अतिक्रमणाबद्दल तक्रारही केली होती.

अनेकजण इच्छुक

शिवोलीतून गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांच्याप्रमाणेच भाजपचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षातर्फे सध्या तरी काणका-वेर्लातील बिल्डर तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर आणि माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर यांचे पुत्र तथा शिवोली गट युवा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. रोशन चोडणकर अशी दोनच प्रमुख नावे चर्चेत आहेत. विधानसभेसाठी काँग्रेसशी इतर पक्षांची युती घडून आल्यास शिवोलीतील राजकीय चित्र निश्चितच बदलू शकते. कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री असलेल्या मायकल लोबो यांनी पत्नी दिलायला लोबो या शिवोलीतून निवडणूक लढवणार असल्याचा इरादा स्पष्ट केला आहे. हे सर्व चित्र पाहता या मतदारसंघात अनेक जण उमेदवारीसाठी इच्‍छुक असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com