Goa Ration Card Holder Dainik Gomantak
गोवा

कौटुंबिक उत्पन्नानुसार सरकारी अधिकारी, जनतेला रेशन कार्डमध्ये बदल करण्याचे आवाहन; नागरी पुरवठा विभागातर्फे नोटीस जारी

15 मे 2023 पर्यंत त्यांच्या रेशन कार्डमध्ये आवश्यक बदल करण्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Goa Ration Card Holder : नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे सर्व सरकारी सेवकांना आणि सामान्य जनतेला 15 मे 2023 पर्यंत त्यांच्या रेशन कार्डमध्ये आवश्यक बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी रेशन कार्डधारकांना अर्ज दाखल करण्याचे सांगण्यात आले असून यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे.

जारी केलेल्या नोटीसनुसार, सर्व सरकारी अधिकारी आणि सामान्य जनतेला आपल्या रेशन कार्डमध्ये आवश्यक बदल करण्यास त्वरित अर्ज करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात, सर्व सरकारी सेवकांना आणि सामान्य जनतेने ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 50,000 रु.च्या वर असल्यास त्यांनी त्यांचे रेशन कार्ड AAY (अंत्योदय अन्न योजना) किंवा PHH (प्राधान्य कुटुंब योजना) वरून APL (दारिद्र्यरेषेच्या वर) कार्डमध्ये बदलण्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.

तसेच ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न रु.5,00,000 पेक्षा कमी आहे त्यांनी विभागीय फॉर्म C भरावा. तर ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न रु.5,00,000 पेक्षा जास्त आहे त्यांनी विभागीय फॉर्म D भरून आपली शिधापत्रिका संबंधित तालुका नागरी पुरवठा कार्यालयात जमा करावी.

वरील सर्व कामांसाठी 15 मे 2023 पर्यंत अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. याबाबत, नागरी पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पडताळणी केली किंवा यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली तर संबंधित रेशन कार्डधारकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT