Dengue In Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue In Goa: चिखली आरोग्य केंद्रात डॉक्टरलाच डेंग्यू!

Dengue In Goa: वाढती भीती: दोन नर्स, पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनाही लागण; सर्दी,खोकल्याच्या रूग्णांतही वाढ

दैनिक गोमन्तक

Dengue In Goa: चिखली उपजिल्हा इस्पितळात येणाऱ्या रुग्णांमुळे एका डॉक्टराला व दोन नर्स, तीन-चार पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. शिवाय शहरात डेंग्यूसह सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिखली उपजिल्हा इस्पितळात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारांसाठी येऊ लागले आहेत,अशी माहिती इस्पितळाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल उम्रस्कर यांनी दिली.

वाढत्या रूग्णसंख्येमुळे तेथील डॉक्टर, नर्स तसेच इतरांवर ताण येऊ लागला आहे. डॉ. उम्रस्कर यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत ही स्थिती बदलणार असून डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याची शक्यता आहे.

चिखली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. रजिस्टर काऊंटर सकाळी नऊ वाजता खुला होत असला, तरी रुग्ण व त्यांचे नातेवाईक सकाळी सात-आठ वाजताच रांगेत उभे राहिलेले आढळतात. त्यामुळे काऊंटर वेळेवर खुला व्हावा,अशी मागणी होत आहे. एखादा कर्मचारी रजेवर असेल, तर तेथे पर्यायी कर्मचाऱ्याची नेमणूक करावी,अशीही मागणी होत आहे.

डेंग्यूसदृष्य लक्षणांचे दिवसाला 10 रूग्ण

डॉ. अनिल उम्रस्कर म्हणाले की, सध्या सर्दी-खोकला वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढली आहे. ती हळूहळू कमी होईल. मलेरिया रुग्णांची संख्या अगदी नगण्य आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळणारे रुग्ण वाढत आहेत. दिवसाकाठी असे दहा रुग्ण येतात. मात्र येत्या काही दिवसांमध्ये ती संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

औषध फवारणी; जागृतीसाठी बैठका

वास्को आरोग्य केंद्रातर्फे डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. रहिवाशांमध्ये जागरुकता व्हावी यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. याप्रकरणी नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे,असे डॉ.अनिल उम्रसकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT