Dengue in Goa Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत डेंग्यूच्या रुग्णांत वाढ ; गावागावांत उपाययोजना

चिंता वाढली ; औषध फवारणी सुरू

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्या वाढत आहे. सध्या ही संख्या 70 हून अधिक झाल्याने तालुक्यातील डेंग्यूचा धोका कायम आहे. वाळपईतील खासगी इस्पितळात, सरकारी आरोग्य केंद्रात रुग्ण उपचारासाठी भरती केले जात आहेत. दर दिवशी एक दोन रुग्ण इस्पितळात दाखल होत आहेत.

सुरवातीला कोपार्डे, सातोडे, भिरोंडा या गावात जवळपास तीस रुग्ण आढळले होते. त्यानंतर वाढ होताना दाबे, धामशे, करंझोळ गावात संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. आता तर अन्य काही गावातही रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सत्तरी तालुक्यात चिंता वाढली आहे. वाळपई आरोग्य केंद्राचे प्रमुख आरोग्यधिकारी डॉ. अभिजीत वाडकर, ज्येष्ठ डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ व त्यांचे पथक सध्या विविध गावात जागृती करत आहेत.

उपाययोजना म्हणून औषध फवारणी करण्यात आली असून ते काम सुरूच ठेवले आहे. सध्या आणखी सापडलेल्या रुग्णांना आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉ. अभिजीत वाडकर यांनी लोकांनी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता बाळगावी असे त्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT