Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Dengue in Goa: गावडोंगरीत ६१, तर पाळोळेत डेंग्यूचे २ रुग्ण : डॉ. जुझे तावारिस

Dengue Cases in Goa: सभापतींकडून दखल; मतदारसंघात जागृती अभियान

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद, काणकोण मतदारसंघात डेंग्यू आतापर्यंत नियंत्रणात असून गावडोंगरी येथे सर्वांत जास्त ६१, तर पाळोळे भागात फक्त डेंग्यूचे दोन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तावारीस यांनी (आज) सोमवारी काणकोण सामाजिक इस्पितळाला भेट दिल्यानंतर दिली.

दरम्यान, आपण यासंबंधी ३ दिवसानंतर व्यापक जागरुकता अभियान राबविणार असल्याचे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले.

डेंग्यूची दाहकता समजून घेऊन या आरोग्य केंद्राकडून दक्षता घेतली जात आहे. रुग्ण अधिक वाढू नयेत यासाठी उपाययोजना चालू केली आहे. गावडोंगरी, झिल्तावाडी येथे २१ मे रोजी पहिला रुग्ण सापडला होता.

२२ मे पासून जागरुकता सुरू करण्यात आली होती, असे आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तावारीस यांनी सांगितले. मात्र, रुग्ण संख्या वाढत आहे. किनारी भागात डेंग्यूचा फैलाव वाढू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

डेंग्यूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. पाण्याची साठवण होणार नाही, याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे,असे डॉ‌. दिवाकर वेळीप म्हणाले.

सभापतींकडून धीर

सभापती डॉ.रमेश तवडकर यांनी डेंग्यू रुग्णांच्या कक्षाला भेट देऊन रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धीर दिला.त्यानंतरच पुढील ३ दिवसांसाठी सरकारी कामानिमित्त दिल्लीला प्रयाण केले.

दि.२९ जून रोजी, गावडोंगरी येथील जागृती अभियानात ते भाग घेणार असल्याचे स्थानिक पंचायत सदस्य प्रभाकर गावकर यांनी सांगितले.

डेंग्यू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

सध्या डेंग्यू रुग्णांकरता वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. मडगाव येथील सरकारी इस्पितळात ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काणकोण पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रणय नाईक यांनी यासंबंधी सांगितले,की डेंग्यूची लागण झाली तर ताप येतो, हात-पाय लटपटू लागतात. त्यानंतर उलटी होऊ लागते.

बरेचशे रुग्ण पहिले काही दिवस खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतात व स्थिती नियंत्रणाबाहेर जाताच शेवटच्या क्षणी सरकारी इस्पितळात उपचारांसाठी येतात,तसे नागरिकांनी करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT