Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Dengue In Goa: डेंग्यूच्‍या पार्श्वभूमीवर घ्या काळजी

Dengue Cases: जिल्हा पंचायतीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात जनजागृती निर्माण करण्याची सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक वॉर्डात जागृती केली जात आहे. सांडपाण्याचा निचरा होणारी ठिकाणे, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी औषध फवारणी केली जात असून, नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याच्या विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आहेत. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात होणाऱ्या डासांची उत्पत्ती आणि दूषित पाण्यामुळे होणारे कॉलरा, गॅस्ट्रो असे आजार टाळण्यासाठी ग्रामीण भागात खबरदारी घेतली जात आहे.

जिल्हा पंचायतीकडून यासंबंधी नुकतेच प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात जनजागृती निर्माण करण्याची सूचना करण्यात आली आहे. गावातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून त्या ठिकाणी स्वच्छता कार्य राबवावे, घरोघरी सर्वेक्षण केले जावे, शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम प्रत्येक कुटुंबाला समजावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यापक प्रचार हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गल्लीत रिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छतेचे आवाहन केले जात आहे. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासह गावातील गटारी इतर ठिकाणी औषध फवारणी देखील केली जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून देखील आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका घरोघरी फिरून घरात आठ दिवसांपासून अधिक काळ पाणी साठवून न ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Smartphones: 5G, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि गेमिंगसाठी जबरदस्त... 'हे' स्मार्टफोन मिळतायत फक्त 15 हजारांत

Konkani Drama: स्तिमित करणारा आविष्कार; ‘मरणथाव’

नेपाळनंतर 'या' देशात Gen-Z करणार सत्तापालट? भ्रष्टाचार आणि ड्रग्सचा मुद्दा तापला, तरुणाई उतरली रस्त्यावर, तणाव शिगेला; VIDEO

India vs Pakistan: हाय-व्होल्टेज क्लॅश, आज भारत- पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! कुठे अन् किती वाजता पाहता येणार सामना?

IND vs SA 1 Test: बाप रे बाप! सिराजचा स्पेल अन् स्टंप्सची मोडतोड, घातक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हतबल; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT