Dempo Sports Club and Hyderabad FC Dainik Gomantak
गोवा

Second Division Football : धेंपो क्लबची विजयी सांगता

हैदराबाद संघाविरुद्ध साईशचा गोल निर्णायक

किशोर पेटकर

सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू साईश बागकर याने नोंदविलेल्या गोलमुळे धेंपो स्पोर्टस क्लबला द्वितीय विभागीय फुटबॉल स्पर्धेत ‘ड’ गटातील मोहिमेची सांगता विजयाने करता आली. गुरुवारी एला-जुने गोवे येथे झालेल्या लढतीत त्यांनी हैदराबाद एफसीच्या राखीव संघावर 1-0 अशी निसटती मात केली.

सामन्याच्या 65व्या मिनिटास प्रशिक्षक समीर नाईक यांनी व्हिएरी कुलासो याच्या जागी साईशला संधी दिली, अखेरीस तो संघासाठी ‘सुपर सब’ ठरला. धेंपो क्लबने आठ सामन्यांतील चौथा विजय नोंदवला. त्यांचे 14 गुण झाले व पाच संघांच्या गटात तिसरा क्रमांक मिळाला. हैदराबाद संघाला सहावा पराभव पत्कारावा लागला. त्यांचे एफसी गोवा राखीव संघाइतकेच चार गुण झाले.

या गटातील अन्य एका साखळी सामन्यात अहमदाबाद येथे गुरुवारी अंबरनाथ युनायटेड संघाने यजमान एआरए एफसी संघाला 2-1 फरकाने धक्का दिला. इंज्युरी टाईमच्या सहाव्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे एआरए संघाला स्पर्धेत पहिलाच पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत प्रत्येकी आठ सामने खेळल्यानंतर या दोन्ही संघांचे प्रत्येकी १७ गुण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT