Sanguem Town Hall Dainik Gomantak
गोवा

Goa news: अखेर सांगेतील 'टाऊन हॉल' पाडण्याच्या कामास सुरुवात, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेची कारवाई

Sanguem Town Hall: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सांगे पालिकेने गुरुवारी सकाळी ५७ वर्षे जुना टाऊन हॉल पाडण्याच्या कामास सुरुवात केली. प्रथम टाऊन हॉल समोर घातलेला लोखंडी मंडप हटवण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem Town Hall Demolition

सांगे: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सांगे पालिकेने गुरुवारी सकाळी ५७ वर्षे जुना टाऊन हॉल पाडण्याच्या कामास सुरुवात केली. प्रथम टाऊन हॉल समोर घातलेला लोखंडी मंडप हटवण्यात आला.

याबाबत नगराध्यक्ष अर्चना गावकर यांनी सांगितले की, पालिकेच्या मालकीचा ५७ वर्षे जुना टाऊन हॉल जीर्ण झाल्याने तो पाडण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू होते. पण त्या प्रयत्नांना आडकाठी येत होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने जीर्ण टाऊन हॉल हटविण्याचे आदेश दिल्यानंतर पालिकेने ही कारवाई हातात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी सांगितले की, धोकादायक टाऊन हॉल पाडण्यात यावा या मतांचा आपण पूर्वीपासून होतो. यापूर्वी धोकादायक झाड पडून एका निरापराध महिलेला जीव गमवावा लागला, तशी दुर्घटना इथे घडू नये, अशी प्रार्थना आपण करत होतो. कारण यापूर्वी दोन वेळा या टाऊन हॉलची पडझड झाली आहे.

नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस यांनीही या कारवाईचे समर्थन करताना या ठिकाणी पुढील काळात चांगली वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी नगराध्यक्ष अर्चना गावकर, उपनगराध्यक्ष इक्बाल सय्यद, नगरसेवक प्रीती नाईक, फौझिया शेख, संतीक्षा गडकर, मेशू डिकॉस्ता, रुमाल्डो फर्नांडिस, मुख्याधिकारी सिद्धार्थ प्रभू, अभियंता विराज बोळणेकर, पर्यवेक्षक लुईस फर्नांडिस आदी उपस्थित होते. या शिवाय कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सांगे पोलिस तैनात होते.

व्यावसायिक प्रकल्प उभा राहावा

टाऊन हॉल पाडल्यानंतर या जागेत भव्य वास्तू उभारल्यास याचा लाभ पालिका तसेच व्यावसायिक व जनतेला होईल. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेचा योग्य वापर झाल्यास तळघरात पार्किंगची सोय तसेच व्यावसायिक गाळे व विविध कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करणे शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT