Talpona River Dainik Gomantak
गोवा

Talpona Jetty: तळपण नदीचे मुख गाळमुक्त करा; मच्छीमारांच्या मागणीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष

Talpona River: भरतीच्या वेळी मासेमारी बोटी समुद्रात सोडणे व जेटीजवळ आणणे नदीचे मुख गाळाने भरल्याने मत्स्य व्यावसायिकांना शक्य होत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Talpona Jetty

काणकोण: तळपण नदीचे मुख गाळमुक्त करण्याची अनेक वर्षांची मागणी अद्याप धसास लागत नाही. येथील मत्स्य व्यावसायिकांसाठी काणकोण तालुक्यातील एकमेव जेटी तळपण नदीच्या मुखाशी आहे. मात्र, भरतीच्या वेळी मासेमारी बोटी समुद्रात सोडणे व जेटीजवळ आणणे नदीचे मुख गाळाने भरल्याने मत्स्य व्यावसायिकांना शक्य होत नाही. त्यामुळे या नदीचे मुख गाळमुक्त करण्याची गरज आहे.

मच्छीमारी बोटी समुद्रात सोडण्याच्या व मासेमारी करून परत आणण्याच्या मार्गात पाषाणी दगड आहेत. त्यात एक देवाचो फातर म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणी मासेमारी करून येताना मच्छीमार पकडलेल्या माशांपैकी काही मासे या ठिकाणी देवाला अर्पण करतात.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. रविवारी याच कातळाजवळ मच्छीमार बोट रूतली व त्याचवेळी मोठी लाट येऊन बोटीवर धडकली आणि बोट माशांसह समुद्रात उलटली. या होडीत दहा मच्छीमार होते. त्यापैकी चार मच्छीमारांना पोहता येत नव्हते. त्यांना स्थानिक मच्छीमारांनी सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

तळपण जेटीचा विस्तार, दुरुस्ती करण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व तत्कालीन मत्स्योद्योग मंत्र्यांनी पाहणी केली होती, त्यावेळी मुख गाळमुक्त करण्याची मागणी येथील मत्स्य व्यावसायिकांनी लावून धरली होती. मात्र, त्यानंतर तळपण जेटीचा अद्याप उद्धार झाला नाही, अशी येथील मत्स्य व्यावसायिकांची कैफीयत आहे.

मंगळवारी गोव्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करणारी कर्नाटकमधील बोट मत्स्योद्योग खात्याने ताब्यात घेतली. मात्र, ती तळपण जेटीवर आणणे शक्य नसल्याने ती कुटबण जेटीवर नेण्याची पाळी मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांवर आली.
रुद्रेश नमशीकर, पैंगीणचे पंच व मत्स्य व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT