Sal River: साळ नदी स्वच्छ करा अन्यथा दक्षिण गोव्याचे भवितव्य धोक्यात

Churchill Alemao: एकेकाळी साळ नदीला मोठे महत्त्व होते व त्याचा फायदा व्यापारी आपला माल बोटीने आणत
Churchill Alemao: एकेकाळी साळ नदीला मोठे महत्त्व होते व त्याचा फायदा व्यापारी आपला माल बोटीने आणत
Churchill AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: आपण आमदार असताना खारेबांदच्या कडा बांधल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही रस्त्यावर पाणी आले नव्हते, मात्र, आता तेथून पश्र्चिम बगलमार्ग जात असून शेतात पाणी साचले आहे. त्याच बाजूने साळ नदीचा प्रवाहही जात आहे. एकेकाळी साळ नदीला मोठे महत्त्व होते व त्याचा फायदा व्यापारी आपला माल बोटीने आणत, पण आता साळ नदीची दुर्दशा झाली आहे.

राज्य सरकारने संपूर्ण साळ नदीतील गाळ उपसून स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा दक्षिण गोव्यात जास्त करून सासष्टीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, असा इशारा माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

साळ नदीच्या काठावर खारफुटीची वने उभी झाली आहेत व सभोवतालच्या शेतामध्ये पसरली आहेत, त्यामुळे शेताची नासाडी होत चालली आहे. कायद्याप्रमाणे खारफुटीतून तयार झालेली वनस्पती, झाडे, झुडपे कापणे बंदी आहे.

त्यामुळे साळ नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. अशा स्थितीत सरकारने कायद्यात बदल करून ही वनस्पती, झाडे झुडपे कापणे आवश्यक असल्याचेही मत आलेमाव यांनी व्यक्त केले.

Churchill Alemao: एकेकाळी साळ नदीला मोठे महत्त्व होते व त्याचा फायदा व्यापारी आपला माल बोटीने आणत
Churchill Alemao on Football Club: ...तर चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लब बंद करणार!

‘साळ नदीचे काठ बांधण्याची गरज’

साळ नदीची स्वच्छता नुवेतील दवंडे भागातून केली पाहिजे. त्यासाठी नुवे, फातोर्डा, बाणावली व मडगावच्या आमदारांनी एकत्र येऊन साळ नदीचे पात्र व्यवस्थित बांधून काढणे आवश्यक आहे. आपण खासदार असताना केंद्र सरकारकडून साळ नदीच्या स्वच्छता व देखभालीसाठी तीन हजार कोटी मंजूर केले होते. मात्र, तेव्हा काही लोकांनी गडबड केली. आंदोलन उभारण्याची तयारी केली व हे पैसे परत पाठविण्यात आले, असेही आलेमाव म्हणाले.

Churchill Alemao: एकेकाळी साळ नदीला मोठे महत्त्व होते व त्याचा फायदा व्यापारी आपला माल बोटीने आणत
Sal River: साळ नदी किनाऱ्यावरील पबचे ‘ते’ बांधकाम पाडा!

‘झुआरी ॲग्रोची जमीन परत घ्यावी’

झुआरी येथील झुआरी ॲग्रो कंपनीसाठी सुमारे १५ लाख चौरस मीटर जमीन राज्य सरकारने बिर्ला कंपनीला लीजवर केवळ ०.२५ पैसे प्रति चौरस मीटर दराने दिली होती. आता बिर्ला तिथे बंगले, सदनिका बांधून जवळ जवळ ११ हजार कोटी रुपयांचा फायदा करू पाहात आहे. सरकारने ही जमीन परत आपल्या ताब्यात घ्यावी व दाबोळी विमानतळाच्या विस्तारासाठी वापरावी. दाबोळी विमानतळ बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचे आपण अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. हे विमानतळ बंद करून मोपा विमानतळ सुरू करण्यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, फ्रान्सिस सार्दिन व लुईझिन फालेरो यांचा हात असल्याचे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. सरकारने बिर्ला कंपनीला किती जमीन दिली होती, का दिली होती, किती वर्षांसाठी दिली होती, सरकारने ही जागा आपल्या ताब्यात का घेतली नाही हे स्पष्ट करावे.

चर्चिल आलेमाव, माजी मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com