F4 Indian Championship Racing: मोपा येथे शनिवारपासून 'फॉर्म्युला फोर' रेस; CM प्रमोद सावंतांनी रेसिंग ट्रॅक, कारची केली पाहणी

F4 Indian Championship Racing Goa: ‘एफ फोर इंडियन चॅम्पियनशिप रेसिंग’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या समवेत रेसिंग ट्रॅक व कारची पाहणी केली.
F4 Indian Championship Racing
F4 Indian Championship RacingDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजीछ मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १४ व १५ रोजी होणाऱ्या ‘एफ फोर इंडियन चॅम्पियनशिप रेसिंग’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या समवेत रेसिंग ट्रॅक व कारची पाहणी करून त्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की या ‘इव्हेंट’ मुळे देश-विदेशातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, सरकार अशा उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देते.

F4 Indian Championship Racing
Goa Tourist Assault: आगोंद किनाऱ्यावर दिवसाढवळ्या राडा! परदेशी महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण; 22 वर्षीय रोहनला बेड्या

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, काहींनी या रेसला काहींनी विरोध केला होता. मात्र, ‘फोर इंडियन चॅम्पियनशिप रेसिंग’ला सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे आपणही त्याला पाठिंबा देत आहोत.

F4 Indian Championship Racing
Goa Temple Theft: वेेरेत मंदिराची काैले काढून चोरांनी फंडपेटी केली लंपास, चौघा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले, हा इव्हेंट क्रीडा क्षेत्राला वाव देण्याबरोबरच विविध देशांतील पर्यटक ही ‘रेसिंग’ पाहण्यासाठी येतील, तसेच दिग्गज स्पर्धक सहभागी होणार आहेत. आपणही या रेसचे स्वागत करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com