Hindu organization Demand In Valpoi Police Sapna Samant
गोवा

Goa News: प्रभू श्रीरामांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याला अटक करा; हिंदू संघटनेची मागणी

Goa News: फोंड्यात तणाव; कडक कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

दैनिक गोमन्तक

Goa News: समाज माध्यमांवरील लोकांच्या उठाठेवी सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. आता प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे नाझीम अस्लम याला अटक करावी, अशी मागणी हिंदू संघटना आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.

त्यांनी फोंडा आणि वाळपई येथे पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

ख्रिस्ती धर्मगुरूंनी चर्चमध्ये प्रवचन देताना दोन प्रकरणात आक्षेपार्ह विधान केल्याच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर फिरू लागल्यावर पोलिसांना कारवाई करावी लागली होती. फादर बोलमॅक्स परेरा या ख्रिस्ती धर्मगुरूला अटकपूर्व जामीनही मिळवावा लागला होता.

त्यानंतर मुस्लीम धर्माच्या संस्थापकाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचे प्रकरण घडले आणि किशन नाईक याला पोलिसांनी अटक केली. ते प्रकरण शमत असतानाच हे नवे प्रकरण समोर आले आहे.

धार्मिक सलोखा आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याच्या प्रतिमेला नख लावण्याचे प्रकार वाढत चालल्याचे यावरून दिसते. प्रभू श्रीरामांविषयी समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह प्रतिक्रियेनंतर सोमवारी फोंड्यात तणाव निर्माण झाला व पोलिस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला.

यावेळी हिंदवी स्वराज्य संघटनेने फोंडा पोलिस स्थानकात संबंधितास अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. फोंडा पोलिसांनी गुन्हा क्रमांक १२२/२०२३ अन्वये २९५-अ, ५०५ (२) आयपीसी अंतर्गत तक्रार नोंदवून घेतली आहे.

या प्रकरणी हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी वासुदेव नाईक यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी इस्लाम धर्मावर कोणीतरी नको ते विधान केले होते, तेव्हा एका न्यूज चॅनलच्या फेसबुक लाईव्ह पोस्टला नाझीम अस्लम याने प्रभू श्रीराम यांच्यावर अश्लील शब्दांत प्रतिक्रिया टाकली आहे.

प्रभू श्रीराम आम्हा हिंदूंचे दैवत असल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नाझीम अस्लम याच्याविरोधात आम्ही फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास असून फोंडा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपण यासंदर्भात तपास करून त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आहे. आज आम्ही यासंदर्भात हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे तक्रार दाखल केली आहे, असे फोंड्याचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सांगितले.

‘संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करा’

प्रभू श्रीराम यांच्यावर फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह्य शब्दांचा वापर करून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी वासुदेव नाईक यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली असून फेसबुकवर प्रतिक्रिया टाकणाऱ्या नाझीम अस्लम याला अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे पदाधिकारी राजीव झा, उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, माजी नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक शौनक बोरकर, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वाळपईत हिंदू संघटनेतर्फे वाळपई पोलिस स्थानकातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुस्लीम नेत्यांचीही कारवाईची मागणी

मुस्लीम समुदायातील नेत्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आश्वासन त्यांना दिले. यावेळी हज समितीचे अध्यक्ष ऊर्फान मुल्ला उपस्थित होते.

वाळपईत हिंदू संघटनेतर्फेही तक्रार

समाज माध्यमावर प्रभू श्रीरामांबद्दल वादगस्त शब्दांचा वापर करून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी वाळपई हिंदू संघटनेतर्फे वाळपई पोलिसात सोमवारी नाझीम अस्लम याला अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी हिंदू संघटनेचे तुळशिदास काणेकर, देमू गावकर, राजाराम सांट्ये, समिर जोशी, मनोज बर्वे, गौरीश गावस, सुशांत हळदणकर, संजू गावस, मिलिंद गाडगीळ, चिंदू नाईक, तसेच इतरांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती. यावेळी पोलिसात तिरसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘धार्मिक तेढ खपवून घेणार नाही’

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकणारी कृत्ये करणाऱ्यांविरोधात थेट कठोरातील कठोर कारवाई करा, असा सक्त आदेश पोलिसांना दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

फेसबुकवर प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. ते म्हणाले, या आधीही असा इशारा दिला होता, तरी काहीजण त्यातून काही शिकलेले नाहीत.

त्यांच्यावर कारवाई झाली आणि होणार आहे. धार्मिक सलोखा व शांततेसाठी गोवा ओळखला जातो. ती ओळख पुसण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारवाईतून कोणालाही सूट दिली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT