Goa Water Sports Dainik Gomantak
गोवा

Illegal Tourism Practices: गोव्यातील 'बेकायदा' गोष्टींवर राहणार कडक नजर? साहसी पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी

Adventure tourism Goa: हल्लीच जलक्रीडा उपक्रमात एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तेव्हा ११ क्षमता असलेल्या बोटमध्ये सुमारे २० पर्यटक स्वार होते.

Sameer Panditrao

Certification authority Goa adventure tourism

तिसवाडी: केरी येथे पॅराग्लायडिंगच्या दुर्घटनेतून पायलट आणि पर्यटक युवतीचा मृत्यूनंतर गोव्यातील साहसी पर्यटन उपक्रम सूक्ष्मदर्शकाखाली आले आहेत. विशेष म्हणजे गोव्यात हे उपक्रम प्रमाणन करण्यासाठी प्राधिकरण नसल्याने बेकायदा व्यवहार चालू आहेत, असे मत तज्ज्ञ आणि पर्यटन उद्योगातील घटक व्यक्त करीत आहेत.

हल्लीच जलक्रीडा उपक्रमात एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तेव्हा ११ क्षमता असलेल्या बोटमध्ये सुमारे २० पर्यटक स्वार होते. आता केरी येथील दुर्घटनेनंतर पॅराग्लायडिंग उपक्रम बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले. कोणीही येऊन हे उपक्रम निर्धास्तपणे चालवतात. मुख्य म्हणजे उपक्रम प्रमाणन प्राधिकरण नसल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

का हवे प्राधिकरण?

जलक्रीडा असो किंवा पॅराग्लायडिंग उपक्रम यात खूप जोखीम असते, त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य आवश्यक असते. शिवाय उपक्रमात वापरण्यात येणारे साहित्य, प्रशिक्षित कर्मचारी यासारख्या गोष्टी योग्यरीत्या केल्या जात आहे की नाही यावर नजर ठेवण्यासाठी प्राधिकरण गरजे आहे, परंतु गोव्यात याचा अभाव असल्याने खुलेआमपणे दलालांच्या सहकार्याने हे व्यवहार चालत आहेत. एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारने कारवाई करण्याऐवजी नियमांचे पालन करून हे उपक्रम चालणार याची खात्री करून घेतली पाहिजे, असे या घटकांचे म्हणणे आहे.

पर्यटनातील उपक्रम योग्यरीत्या चालणार यासाठी प्रामणन प्राधिकरण नसल्याने हा कारभार होत आहे. ही गोष्ट बऱ्याच वर्षांपासून सुरू असून एकच दुर्घटनेनंतर समोर आली आहे. जलक्रीडा आणि पॅराग्लायडिंग उपक्रम हे करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असते. आता येथे काम करणारे आणि चालवणारे प्रशिक्षित आहे की नाही याची पुष्टी होणे आवश्यक आहे.
कर्नल मिलिंद प्रभू, तज्ज्ञ
राज्यातील पर्यटन उपक्रम नियमांचे पालन करून चालतात काही नाही याचे प्रमाणन प्राधिकरण गरजचे असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही जलक्रीडा, साहसी उपक्रम यात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे, परंतु नियमांचे पालन केले जाते की नाही, यासाठी सरकारने जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे.
नीलेश शहा, माजी अध्यक्ष, टीटीएजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT