The expectations of the people have increased; Demand for attention to Margao Municipality, Komunidad building Dainik Gomantak
गोवा

जनतेच्‍या अपेक्षा वाढल्‍या; नगरपालिका, कोमुनिदाद इमारतीकडे लक्ष देण्‍याची मागणी

मडगाव कब्रस्थानच्या प्रश्नावरही मंत्री राणे यांनी तोडगा काढण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : वारसास्‍थळ असूनही सध्या दुर्लक्षित राहिलेली आणि गेली कित्येक वर्षे रंगरंगोटीच्‍या प्रतीक्षेत असलेली मडगाव नगरपालिकेची तसेच कोमुनिदादच्‍या इमारतीकडे उद्या मंगळवारी सोनसोडो कचरा समस्‍येवर तोडगा काढण्यासाठी येणारे नगरविकासमंत्री विश्वजीत राणे आणि महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी लक्ष द्यावे अशी मडगावकारांची मागणी आहे.

खरे तर एक वारसास्‍थळ म्हणून जिचे जतन करण्याची गरज आहे त्या नगरपालिका इमारतीची दुर्दशा झाली आहे. या पालिकेची महसुलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेची आर्थिक स्थिती एवढी कमकुवत झाली आहे की कित्येकदा कर्मचाऱ्यांना पगार कसा घालावा ही चिंता मुख्याधिकाऱ्यांना ग्रासत असते. या सर्व गोष्टी जागेवर घालण्यासाठी मंत्री राणे यांनी लक्ष देण्याची गरज मडगाव येथील दीपक कामत यांनी व्यक्त केली.

मागची कित्येक वर्षे लोंबकळत पडलेला मडगाव कब्रस्थानच्या प्रश्नावरही मंत्री राणे यांनी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा आहे असे मत येथील रियाझ शेख यांनी व्यक्त केली. शेख म्हणाले, राणे हे नगरनियोजनमंत्रीही आहेत. या कब्रस्थान विषयावरून आम्हा मुस्लिमांना गेली कित्येक वर्षे झुलवत ठेवले गेले. निदान आता तरी आम्हाला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे.

मडगावात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नाही. मडगाव पालिकेने जो बहुमजली पार्किंग तळ उभारण्याचा निर्णय घेतला होता, तोही सध्या लोंबकळत पडला आहे. मंत्र्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नगरसेवक महेश आमोणकर यांनी व्यक्त केली.

महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्याकडूनही आम्हाला अपेक्षा आहेत. मडगावची कोमुनिदाद इमारत मोडकळीस आली असून तिची ताबडतोब दुरुस्ती हाती घेण्याची गरज आहे. शिवाय या कोमुनिदाद कार्यालयातील दस्तावेज सांभाळून ठेवण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची गरज पॉल फर्नांडिस यांनी व्‍यक्त केली. तर, कोमुनिदाद कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार स्थगित आहे. त्यावर मंत्र्यांनी तोडगा काढावा अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

सोनसोडोबाबत 11 वाजता बैठक

मडगाव शहराची डोकेदुखी ठरलेल्या सोनसोडो कचरा समस्येवर उपाययोजना शोधून काढण्यासाठी उद्या मंगळवारी मंत्री राणे व मोन्‍सेरात सकाळी 11 वाजता भेट देणार आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही या बैठकीत सहभाग घेणार आहेत. या बैठकीतून काही तरी भरीव तोडगा अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT