गोव्यात ‘डेल्टा’चे 64 रूग्ण पॉझिटिव्ह! Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘डेल्टा’चे 64 रूग्ण पॉझिटिव्ह!

गोव्यात (Goa) आतापर्यंत डेल्टा व्हेरियंटचे (Delta variant) 173 रुग्ण मिळाल्याची नोंद झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) आतापर्यंत डेल्टा व्हेरियंटचे (Delta variant) 173 रुग्ण मिळाल्याची नोंद झाली आहे. रविवारी 69 नमुन्यांचे अहवाल मिळाले असून त्यातील 64 अहवाल हे डेल्टा व्हेरियंट आहेत. आतापर्यंत एकही डेल्टा प्लसचा अहवाल नाही ही गोव्‍यासाठी दिलासा देणारी बाब आहे, परंतु डेल्टाच्या संख्येत वाढ झाली, तर चिंता वाढू शकते. पुण्यातील प्रयोगशाळेने मे व जूनमध्ये पाठवलेल्या सॅंपल्सचे अहवाल बरेच उशिरा दिल्यामुळे या 173रुग्णांतील बहुतांश रुग्ण बरे झाले, तर काही दगावले आहेत. यावरून गोवा आरोग्य खात्याची असे विषाणू तपासण्याची स्वतःची प्रयोगशाळा नसल्याने अहवालांना कशी दिरंगाई होते हे स्पष्ट झाले आहे. (Delta's 64 patients tested positive in Goa)

दरम्यान, पुणे येथील प्रयोगशाळेत डेल्टा व्हेरियंटच्या विषाणूंची चाचणी करण्यासाठी गोव्यातून एकूण 184 नमुने पाठवले होते. त्यातील 115 सॅंपल्सचा अहवाल यापूर्वी दोन टप्प्यात मिळाला होता. ज्यात 100 डेल्टा व्हेरियंट व 9 कापाचे रुग्ण आढळले होते. उर्वरीत 69 सॅंपल्सचा अहवाल आज आरोग्य खात्याला मिळाला.

रविवारी एक बळी, 69 नवे रुग्ण

रविवारी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला. 69 नवे रुग्ण आढळून आले. रविवारी 4,867 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात सध्या बरे होण्याची टक्केवारी 97.57 इतकी असून पॉझिटिव्हिटी दर 1.42 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 3,160 बळींची नोंद झाली आहे.

10 लाख लोकांना पहिला डोस

7 ऑगस्टपर्यंत राज्यातील एकूण लसीकरण 13,58,675 झाले असून त्यात 10,65,696 नागिरकांनी पहिला डोस, तर 2,92,808 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. राज्यात 18 वर्षांवरील 11 लाख 90 हजार नागरिक असून त्यातील 10 लाख 65 हजार 969 लोकांनी पहिला डोस घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT