गोव्यात ओळखपत्र नसलेल्या 110 जणांना लस

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजित राड्रगीस यांनी जारी केलेल्या आदेशानंतर गोव्यात लसिकरण मोहीम राबविली गेली.
गोव्यात ओळखपत्र नसलेल्या 110 जणांना लस
गोव्यात ओळखपत्र नसलेल्या 110 जणांना लसDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगावच्या (Margao) अनेक भागांत राहणाऱ्या पण ओळखपत्र नसलेल्या तब्बल 110 जणांना शनिवारी एका विशेष मोहिमेअंतर्गत मोतीडोंगरावरील टीबी इस्पितळात कोरोनाप्रतिबंधक लस (Vaccination) देण्यात आली. दक्षिण गोव्याचे (South Goa) अतिरिक्त जिल्हाधिकारी संजित राड्रगीस यांनी जारी केलेल्या आदेशानंतर ही मोहीम राबविली गेली. लसीकरण मोहिमेच्या प्रमुख तथा आरोग्य खात्याच्या उपसंचालक डॉ. आयरा आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण पार पडले. (110 people without ID cards were vaccinated In Goa)

जिल्हा प्रशसनासनाने त्यासाठी असे किती जण लसीकरणविना बाकी राहिले आहेत त्यांची पाहाणी करून नोंदणी केली व शनिवारी पोलिसांनी त्यांना हुडकून काढून लसीकरणासाठी नेले. त्यात जास्त करून बेघर, कामगार व भिकारी यांचा समावेश होता. यापूर्वीही एकदा जिल्हा प्रशसनाने अशीच मोहीम राबविली होती.

गेल्या आठवड्यात सरासरी 100 कोविडबाधितांची नोंद झाली असून पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 2 टक्के आहे. तरीही तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारने आवश्यक ती तयारी अद्याप केलेलीच नाही. दुसऱ्या लाटेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्वरित पावले उचलण्याचा सावधगिरीचा इशारा आम आदमी पक्षाने सरकारला दिला आहे.

गोव्यात ओळखपत्र नसलेल्या 110 जणांना लस
Goa Curfew: संचारबंदीत पुन्हा आठवडाभर वाढ

दुसऱ्या लाटेने सरकारला गोंधळात टाकले होते. राज्याच्या सीमा बंद करण्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने राज्यात काही दिवसांतच कोविडचे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता निर्माण झाली. गैरव्यवस्थापनामुळे प्राणवायू न मिळाल्यामुळे अनेक गोमंतकीयांना जीव गमवावा लागला. राज्यात सध्या 1006 सक्रिय कोरोना रुग्ण असून कालच 109

मुख्यमंत्र्यांनी जुलै महिन्यापर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट घोषित केले होते, ते आता सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळत आहेत. कर्नाटकनेही महाराष्ट्राच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये हालचाली प्रतिबंधित केल्या आहेत. केरळमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, सावंत सरकारने तिसरी लाट रोखण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना आखली नाही किंवा कोणतीच घोषणा केलेली नाही, असे ‘आप’चे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

‘आप’ने स्‍थापन केली स्‍वयंसेवकांची फौज

या कठीण काळात आम आदमी पक्षाने ऑक्सिजन तपासणी केंद्रांद्वारे लोकांना ऑक्सिजनची पातळी तपासण्यात मदत करून ऑक्सिजन काँन्सेंट्रेटर तसेच लोकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची फौज स्थापना केली. खरे तर भाजप सरकारशिवाय प्रत्येकजण गोमंतकीयांच्या मदतीसाठी पुढे आले. दुसऱ्या लाटेपूर्वीच आम्ही सरकारला इशारा दिला होता, की त्यांनी वाढत्या कोविड प्रकरणांसाठी तयार राहावे आणि लोकांना मदत करावी. दुर्दैवाने सरकारने आमच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले नाही. यावेळीही आम्ही सरकारला इशारा देत आहोत, की त्यांनी गंभीरपणे तिसऱ्या लाटेबाबत उपाययोजना करून काहीतरी निर्णय घ्यावा, असे वाल्मिकी नाईक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com