Delhi Tourists Morjim Beach  Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: बंदी असताना किनाऱ्यावर फिरवल्या गाड्या, Viral Videoतील दोघांवर कारवाई; प्रत्येकी 5 हजार दंड वसूल

Delhi Tourists Morjim Beach: समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवण्यास कायदेशीर बंदी असतानाही ही धाडसी कृती करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला.

Sameer Panditrao

पणजी: रविवार, ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दोन चारचाकी गाड्या फिरवताना आढळून आल्या. साहिल बन्सल आणि मयंक शर्मा हे दिल्लीतील दोन पर्यटक त्या वाहनांमध्ये होते. समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवण्यास कायदेशीर बंदी असतानाही ही धाडसी कृती करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला आणि संतापाची लाट उसळली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यटक पोलिसांनी तत्काळ मोरजी येथे धाव घेतली. वाहन क्रमांक जीए ०४ टी ६९०४ आणि जीए ०८ झेड ०३०४ अशी दोन ‘रेंट-अ-कॅब’ गाड्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिकांच्या मदतीने वाहनचालकांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर साहिल बन्सल व मयंक शर्मा या दोघांना अटक करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गोवा पर्यटन स्थळ (संरक्षण व देखभाल) अधिनियम २०२१ च्या कलम ९अ(२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या अधिनियमानुसार समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून त्यामध्ये कारावासाची शिक्षाही होऊ शकते. पोलिसांनी सांगितले की, पर्यटकांनी स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिस यंत्रणा मागे हटणार नाही.

या घटनेमुळे स्थानिक मच्छीमार आणि व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहन फिरवल्याने वाळूमध्ये खोल खड्डे निर्माण होतात, किनाऱ्याचे नुकसान होते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, अशा कृतीमुळे किनाऱ्यावरील जैवविविधतेवरही परिणाम होऊ शकतो.

पोलिसांनी पुन्हा एकदा सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की, समुद्रकिनारे हे सार्वजनिक ठेवा असून त्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. "पर्यटकांनी वाहनं थेट किनाऱ्यावर आणण्याऐवजी ठरवून दिलेल्या पार्किंग जागेत ठेवावीत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अपरिहार्य आहे," असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

गोव्यात वाढत्या पर्यटक संख्येसोबत अशा नियमभंगाच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे राज्य शासन व पर्यटन खात्याने यावर अधिक कडक पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA ODI Series: द. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित- विराट खेळणार की नाही? नव्या कर्णधाराचीही घोषणा

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Smriti Mandhana: घरात लगीनघाई सुरु असतानाच आला हार्ट अटॅक! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता; पाहुणे परतले

VIDEO: गजराजाची स्टाईल! 'भाऊ टोपी घाल' म्हटल्यावर हत्तीनं घातली... सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

SCROLL FOR NEXT