Pernem Accident Dainik Gomantak
गोवा

Pernem Accident: दिल्लीच्या पर्यटकाचा मृत्यू, रशियन महिला जखमी; पेडण्यात दोन दुचाकींचा अपघात

Goa Fatal Accident: सागर आणि ज्युलिया एका दुचाकीवरुन जात असताना हरमलकडून केरीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली.

Pramod Yadav

पेडणे: पालये येथे दोन दुचाकीत झालेल्या अपघातात दिल्लीतील ३० वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला असून, ३९ वर्षीय रशियन महिला जखमी झाली आहे. रविवारी उत्तररात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. दिल्लीत युवक आणि रशियन महिला एकाच दुचाकीवरुन प्रवास करत असताना भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली.

निखिल सागर (वय ३०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, ज्युलिया (वय ३९) असे जखमी झालेल्या रशियन पर्यटक महिलेचे नाव आहे. तिच्यावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मांद्रे पोलिस स्थानकाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गोविंद फाती नाईक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी उत्तररात्री एकच्या सुमारास पालये येथे दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. सागर आणि ज्युलिया एका दुचाकीवरुन जात असताना हरमलकडून केरीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील सागरला गंभीर जखम झाली. यात सागरचा मृत्यू झाला असून, जखमी ज्युलियाला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या दुचाकीवर असणाऱ्या व्यक्तीला देखील गंभीर जखम झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अपघाताचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक प्रतिक गावडे अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT