Panaji Goa: स्मार्ट पणजीत मसाजपार्लरचा सुळसुळाट; 100 मीटरच्या परिघात 8 पार्लर

Massage Parlors Panaji: मध्य पणजीत हॉटेल व तेथून प्रसिद्ध मेरी इमॅक्युलेट चर्च असल्याने पर्यटकांची गर्दी असते. त्याशिवाय काजू, मद्य खरेदीसाठी पर्यटक या परिसरातील दुकांनांना प्राधान्य देतात.
massage parlors goa
Panaji massage parlors Dainik Gomantak
Published on
Updated on

Growth of massage parlors in Goa

पणजी: मध्य पणजीत सध्या काही महिन्यांत शंभर मीटरच्या परिघातामध्ये आठ मसाजपार्लर निर्माण झालेले आहेत. तर शहर परिसरात ही संख्या २० वर पोहोचली आहे. त्यामुळे एका बाजूला पणजी स्मार्ट सिटी बनत असताना पर्यटनाच्या नावाखाली शहर वेगळेच रूप धारण करणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजीला फेस्टिवल सिटी करण्यासाठी पावले उचलली होती. त्यावेळी पणजी शहराबाहेर म्हणजे दोना पावला किंवा इतर पंचतारांकित हॉटेलमध्ये मसाजपार्लरची सेवा उपलब्ध होती.

परंतु मागील पाच-दहा वर्षांत पणजी शहराचा कायापालटच होऊ लागला आहे. त्यात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहराचा समावेश झाल्यानंतर शहरामध्ये मसाज पार्लरचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

कायदेशीर हा व्यवसाय सुरू असला तरी मध्य पणजीत पाऊल ठेवल्यानंतर शंभर मीटरच्या परिघातामध्ये आठ मसाज पार्लर पाहिल्यानंतर पर्यटकांनाही नक्कीच हे धक्कादायक चित्र अनुभवायला मिळाल्याशिवाय राहत नाही.

massage parlors goa
Panaji: स्मार्ट सिटी विकासाला चालना! सांडपाणी, रस्त्यांचे मॅपिंग होणार; ड्रोनद्वारे डेटा संकलित करण्याचे काम सुरू

संख्या २०० वर!

या सुविधांकडे व्यवसाय म्हणून पाहिला तरी त्यात गोमंतकीय फार कमी आणि परराज्यातील लोकांचा अधिक भरणा आहे. पर्यटकांना आकृष्ट करणारा हा व्यवसाय असल्याने सध्या शहरातील मसाज पार्लरची विद्युत रोषणातील झगमगीत नावे झटकन लक्ष वेधून घेतात. राज्यात मार्च २०२३ पर्यंत अधिकृत परवाना असणाऱ्या मसाज पार्लरची संख्या १५५ होती, आता ती २०० च्यावर नक्कीच गेलेली असणार आहे, असा अंदाज बांधता येऊ शकतो.

massage parlors goa
Panaji: पणजीत 'बेवारस' वाहनांचा प्रश्न ऐरणीवर! खाण खात्याचे वाहन 'स्मार्ट' धुळीत!

खरेदीसाठी गर्दी

मध्य पणजीत हॉटेल व तेथून प्रसिद्ध मेरी इमॅक्युलेट चर्च असल्याने पर्यटकांची गर्दी असते. त्याशिवाय काजू, मद्य खरेदीसाठी पर्यटक या परिसरातील दुकांनांना प्राधान्य देतात. त्यामुळेच सध्या पणजीत मसाज पार्लर व्यावसायिकांनी अधिक प्राधान्य दिलेले असावे असे दिसते. किनारी भागात मसाज पार्लर व्यवसायांवर मागीलवर्षी पोलिसांनी धडक कारवाई केली होती, त्यात अनेक बेकायदा मसाजपार्लर आढळले होते. आता मात्र मसाज पार्लरमध्ये नावाजलेल्या ब्रँण्डने शहरांकडे लक्ष केंद्रीत केलेले दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com