Luthra bail plea Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Birch by Romeo Lane fire case: फुकेट येथे पळून गेलेल्या या बंधूंनी, आपल्यावर गोवा सरकार त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप न्यायालयात केला

Akshata Chhatre

Goa nightclub fire anticipatory bail: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण आगीप्रकरणी मालक सौरव आणि गौरव लुथरा या दोन्ही बंधूंना दिल्लीतील रोहिणी कोर्टाकडून अटकपूर्व जमीन मिळालेला नाही. घटनेनंतर थायलंडमधील फुकेट येथे पळून गेलेल्या या बंधूंनी, आपल्यावर गोवा सरकार त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप न्यायालयात केला आहे.

दिल्ली कोर्टाचा गोव्याला नोटीस, पुन्हा सुनावणी

लुथरा बंधूंनी ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी (Transit Anticipatory Bail) दिल्ली कोर्टात अर्ज दाखल केला आहे. रोहिणी कोर्टाने या अर्जावर गोवा सरकारकडून उत्तर मागवले असल्याने या दोन्ही भावांना अद्याप न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण (Protection from Immediate Arrest) मिळालेले नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार, ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा आणि तनवीर अहमद मीर यांनी कोर्टात लुथरा बंधूंची बाजू मांडली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, लुथरा बंधूंकडे केवळ क्लबचा परवाना आहे, तर स्थानिक व्यवस्थापकांना आधीच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा लगेच दोषी म्हणून गृहीत धरू नये. भारतात परतल्यानंतर दिल्लीत उतरताच त्यांना अटक होण्यापासून संरक्षण मिळावे, जेणेकरून ते गोव्यातील कोर्टात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकतील, अशी मागणी त्यांनी केली.

'आम्ही पीडित आहोत'; मालकांचा धक्कादायक युक्तिवाद

मालक ज्यावेळी आग लागली, त्यावेळी नाईट क्लबमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी जबाबदारी त्यांच्यावर टाकता येणार नाही. आरोपी बंधूंचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. तनवीर अहमद मीर यांनी कोर्टाला सांगितले की, लुथरा बंधूंचे तीन व्यावसायिक भागीदार आहेत आणि ते अनेक व्यावसायिक युनिट्स चालवतात. ते वैयक्तिकरित्या कोणत्याही फर्मच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवत नाहीत.

क्लबचे कामकाज फ्रँचायझी व्यवस्थापक पाहतात, आणि क्लबमध्ये आग लागली तेव्हा व्यवस्थापनाची चूक होती. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज पाहणारे भागीदार किंवा व्यवस्थापक जबाबदार आहेत, ज्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. ॲड. सिद्धार्थ लुथरा म्हणाले, "ते (लुथरा बंधू) देखील पीडित आहेत. या घटनेमुळे त्यांनाही दुःख झाले आहे."

थायलंडमधून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरूच

एकीकडे लुथरा बंधू न्यायालयात धाव घेत असताना, दुसरीकडे तपास यंत्रणा त्यांना थायलंडमधून भारतात परत आणण्यासाठी सक्रिय आहेत. तपासकर्ते फुकेट येथे असलेल्या या दिल्ली-आधारित उद्योजकांना शोधण्यासाठी आणि विद्यमान अटक वॉरंटचा (Existing Arrest Warrant) वापर करण्यासाठी थायलंडच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दोन्ही बंधूंना तत्काळ अटक करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. "याबाबत राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात असून, या दोघांनाही लवकरच अटक करण्यात येईल," असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"रंगपंचमीलाच रक्ताचा सडा!" प्रियकरासोबत संसार थाटणाऱ्या बायकोची भररस्त्यात केली हत्या; संतापलेल्या नवऱ्यानं काढला काटा

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT