Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बाप रे! सेक्सटॉर्शनच्या पैशांतून उघडले रेस्टॉरंट; चोरट्यांच्या टोळीचा प्रताप

Criminal Gang's Restaurant Funded by Extortion: सेक्सटॉर्शनचा वापर करून अनेक धनाढ्य लोकांना लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या संशयिताला म्हापसा पोलिसांनी दिल्लीतून शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, या टोळीने भागीदारीमध्ये खंडणीच्या पैशांतून दिल्लीत रेस्टॉरंट उघडले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Police Arrest Fourth Member of Sextortion Gang in Delhi

म्हापसा: सेक्सटॉर्शनचा वापर करून अनेक धनाढ्य लोकांना लुटणाऱ्या टोळीतील चौथ्या संशयिताला म्हापसा पोलिसांनी दिल्लीतून शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, या टोळीने भागीदारीमध्ये खंडणीच्या पैशांतून दिल्लीत रेस्टॉरंट उघडले आहे. अधिकतर व्हाईट कॉलर व्यावसायिकांना टोळी सावज बनवायची, असे पोलिस तपासातून समोर आले आहे.

दिल्ली नार्कोटिक ब्युरोचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाचे सेक्सटॉर्शन करून आर्थिक मोबदल्यासाठी फिर्यादीला ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील अटक केलेल्या चौथ्या संशयिताचे नाव मोहम्मद बशीद खान (दिल्ली) असे असून, त्याला स्थानिक न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आणखीन काहींचा सहभाग असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, अटक केलेला चौथा संशयित मोहम्मद हा देश सोडून पलायनाच्या तयारीत असताना, म्हापसा पोलिसांनी त्याला दिल्लीतून सापळा रचून अटक केली. लुबाडणुकीचा हा प्रकार ऑगस्ट २०२३मध्ये घडला होता. फिर्यादीच्या म्हापशातील बंगल्यावर काही संशयितांनी फिर्यादीस दिल्लीतील अमली पदार्थ विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून मारहाण करीत, नंतर त्याच्याकडून पैसे उकळले होते. याप्रकरणात म्हापसा पोलिसांनी भादंसंच्या कलम ३४२, १७०, ३२३, ५०६(२), ३८९ व ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता.

अवैध मार्गाने उदरनिर्वाह

व्यावसायिकाकडून ३० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणात म्हापसा पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. ज्यामध्ये निवेदिता शर्मा, फैजान खान, भुवन अरोरा यांचा समावेश होता. या सेक्सटॉर्शनमध्ये मुलींचा वापर करून श्रीमंत व्यावसायिकांना लक्ष्य करण्याचे काम ही टोळी करायची. विशेष म्हणजे, ही टोळी सेक्सटॉर्शनच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये आढळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT