Delhi To Goa flight Passenger smokes in toilet Dainik Gomantak
गोवा

Delhi To Goa flight: विमानाच्या टॉयलेटमध्ये सिगारेट पेटवली अन…; दिल्ली-गोवा फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ! प्रवाशावर गुन्हा दाखल

Delhi To Goa flight Passenger smokes in toilet: विमान प्रवास करताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते, मात्र अनेकदा काही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालतात.

Sameer Amunekar

Delhi Goa Flight Incident : विमान प्रवास करताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते, मात्र अनेकदा काही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच आकासा एअरच्या दिल्ली-गोवा विमानात घडली आहे. विमानाच्या शौचालयात धूम्रपान करणाऱ्या एका प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आकासा एअरचे विमान दिल्लीहून गोव्याच्या दिशेने झेपावले होते. दरम्यान, विमान हवेत असताना दिल्लीत राहणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील शौचालयात जाऊन विडी पेटवली. विमानाचे शौचालय हे धूर आणि आग रोखणाऱ्या उपकरणांनी सज्ज असते. त्यामुळे धूम्रपान सुरू असतानाच उपकरणांनी धोक्याचा इशारा दिला आणि विमानातील कर्मचारी सतर्क झाले. क्रू मेंबर्सनी तातडीने तपासणी केली असता, संबंधित प्रवाशाने विडी ओढल्याचे उघड झाले.

विमानतळ पोलिसांकडून कारवाई

विमान गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा एअरपोर्ट) सुरक्षितपणे लँड झाल्यानंतर, संबंधित प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले. आकासा एअरच्या सुरक्षा व्यवस्थापकांनी या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विमान प्रवासात सुरक्षेचे नियम महत्त्वाचे

विमानात धूम्रपान करणे हा केवळ नियमांचा भंग नसून तो एक गंभीर 'सुरक्षा गुन्हा' मानला जातो. विमानातील मर्यादित ऑक्सिजन आणि दाबाच्या वातावरणात धूर किंवा आगीची ठिणगी मोठी दुर्घटना घडवू शकते.

विमान वाहतूक क्षेत्रात अशा कृत्यांकडे 'झिरो टॉलरन्स' धोरणाने पाहिले जाते. या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान प्रवासातील शिस्त आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, विमान कंपन्यांनीही प्रवाशांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT