Students in Goa  Dainik Gomantak
गोवा

उत्पन्नाचे दाखले देण्यास दिरंगाई ; विद्यार्थी त्रस्त

कुतीन्हो यांनी एमएमसीचे मुख्य अधिकारी रोहित कदम यांना विनंती केली की त्यांनी कृपया या प्रकरणात लक्ष घालावे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : उत्पन्नाचे दाखले देण्यास दिरंगाई होत असल्यामुळे विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास विद्यार्थ्यांना अडचण होत आहे, असा आरोप मडगावच्या स्थानिकांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना, सावियो कुतीन्हो, संयोजक, शॅडो कौन्सिल फॉर मारगाव (SCM) म्हणाले, "विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची हीच वेळ आहे. दाखले मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते."

SCM ने असा दावा केला आहे की अशा अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी स्वतः वेळ निश्चित केली आहे. यामुळे ते संध्याकाळच्या सत्रात अर्ज/प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणे टाळतात.

कुतीन्हो यांनी एमएमसीचे मुख्य अधिकारी रोहित कदम यांना विनंती केली की त्यांनी कृपया या प्रकरणात लक्ष घालावे आणि अर्जदारांना आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्रे कमीत कमी वेळेत देण्यात यावीत.

त्यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, कोणताही कर्मचारी गैरहजर असला, तरी अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी लिंक अधिकारी असावा; आणि अधिकाऱ्याची अनुपस्थिती हे अर्जाच्या हालचालींना ब्रेक लावण्याचे कारण असू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT