Defamatory Post Lairai Devi Dainik Gomantak
गोवा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

गोमन्तक डिजिटल टीम

Defamatory Post Lairai Devi

शिरगाव येथील श्रीदेवी लईराई जत्रोत्सवानिमित्त होमकुंड पेटवून धोंड भक्तगणांकडून अग्निदिव्य पार केले जाते. मात्र, या होमकुंडाला उद्देशून तसेच त्यामुळे प्रदूषणाला हानी पोहचते, असा संदर्भ देत म्हापशातील एका युवतीने आक्षेपार्ह पोस्ट 'सोशल मीडिया' वर टाकली होती.

या प्रकरणाचा निषेध करत आज मंगळवारी पुन्हा एकदा धोंड तसेच इतर भक्तगण मोठ्या संख्येने म्हापसा पोलिस स्थानकात जमले. संशयितास अटक करावी, अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखून कायदा- सुव्यवस्था हातात घेतली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

सकाळी 11च्या सुमारास शेकडो भाविक पोलिस स्थानकात दाखल झाले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांच्या शिष्टमंडळास पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक निखिल पालेकरांची भेट घेण्यास परवानगी देण्यात आली.

उर्वरित लोकांना स्थानकाच्या मुख्य फाटकाबाहेरच ठेवण्यात आले. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा स्थानकाच्या आवारात ठेवलेला.

Mapusa Police

भक्तगण उपेंद्र गावकर म्हणाले की, युवतीने टाकलेल्या पोस्टमुळे लईराई देवीच्या भक्तगणांची धार्मिक भावना दुखावली आहे. कुठल्याही परिस्थितीत तिला पोलिसांना अटक करावी अशी आमची मागणी आहे.

याप्रकरणातील संशयितास अटक करण्याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रव्यवहार करुन परवानगी मागणार असे सांगितले आहे. त्या युवतीला अटक करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असेही ते म्हणाले.

आईने मागितली होती माफी

गेल्या मंगळवारी (ता.14) सायंकाळी शेकडोंच्या संख्येने श्री लईराई देवीच्या भक्तगणांनी म्हापसा, कोलवाळ व डिचोली पोलिसांत एकत्रित होऊन तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी संशयित युवतीवर भादंसंच्या कलम 295 (अ) कलमांतर्गत गुन्हा नोंद केलेला. या प्रकारानंतर संशयिताच्या आईने आपली मुलगी अल्पवयीन असल्याचा दावा करीत लईराईच्या भक्तगणांची माफी मागितली होती.

तसेच सदर पोस्ट युवतीने आपल्या सोशल मीडियावरुन डिलीट केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT